Uncategorized

गोव्यात महिलांची रस्त्यावरही सुरक्षितता राहिलेली नाही : कॅ. विरियातो…

महिलांना दिवसा घराबाहेर पडतानाही भीती वाटते,

गोव्यात महिलांची रस्त्यावरही सुरक्षितता राहिलेली नाही : कॅ. विरियातो…

वास्को : दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी गोव्यात महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारवर जोरदार टीका केली असून, आज महिलांना दिवसा घराबाहेर पडतानाही भीती वाटते, असे सांगितले.

“गोव्यात एक काळ होता, जेव्हा महिला रात्रीसुद्धा सुरक्षित होत्या. कामामुळे किंवा बस बंद पडल्यामुळे त्यांना उशीर झाला तरी कोणी काळजी करत नसे. पण आज महिला घराबाहेर पडल्या की, त्या परत येईपर्यंत घरच्यांना काळजी वाटते,” असे फर्नांडिस म्हणाले.

“आज जर तुम्ही संध्याकाळी पणजीत, विशेषतः कॅसिनो जेटी असलेल्या वॉटरफ्रंटवरून जात असाल, तर दिल्लीतून किंवा देशाच्या इतर भागातून आलेले लोक आपल्या महिलांना व मुलींना विचारतात, त्या कितीला उपलब्ध आहेत? आपल्या महिलांना हे सहन करावे लागते का?” असा संतप्त प्रश्नही कॅ. फर्नांडिस यांनी उपस्थित केला.

वास्को येथे गोवा प्रदेश महिला काँग्रेसने (जीपीएमसी) मुरगाव, वास्को, कुठ्ठाळी आणि दाबोली या चार ब्लॉक्सच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणत संघटन मजबूत करण्यासाठी बैठक घेतली.

या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन विरियातो फर्नांडिस उपस्थित होते. यावेळी चार नवीन महिला ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली : श्रद्धा कळंगुटकर (वास्को), अक्षदा वाडेकर (दाबोली), विनिका आरोळकर (मुरगाव), आणि लता नाईक (कुठ्ठाळी).

या बैठकीला माजी महिला काँग्रेस अध्यक्ष बीना नाईक, उपाध्यक्ष स्नेहा फोंडेकर व लिबराता मदेरा, सरचिटणीस अ‍ॅड. शबनम खान, जिल्हाध्यक्ष ममता माबेन व मॉली दा गामा सिल्वा, दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष संगीता नाईक आणि कार्यकारिणी सदस्या सीमा बेहरे उपस्थित होत्या.

बीना नाईक यांनी सत्ताधाऱ्यांच्या कुशासनावर आणि वाढत्या महागाईवर टीका करत महिलांवर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधले.

ममता माबेन यांनी महिला काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एकता ठेवण्याचे आवाहन करत २०२७ मध्ये सध्याच्या सरकारला पराभूत करण्यासाठी प्रभावी ब्लॉक व बूथ समित्या कशा तयार कराव्यात, यावर मार्गदर्शन केले.

महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप यांनी गोव्यात वाढत्या महिलांवरील गुन्ह्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. “आज कुठलीही महिला सुरक्षित नाही. ती मग मुलगी, अल्पवयीन, दलित, ज्येष्ठ नागरिक, नर्स, डॉक्टर, शिक्षिका, गरोदर महिला किंवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ महिला असो. या सरकारखाली कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था पूर्णपणे ढासळली आहे. आता प्रत्येक महिलेनं एकत्र येऊन २०२७ मध्ये या भ्रष्ट्र आणि गुन्हेगारी सरकारला हाकलून देणे गरजेचे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितलं.

त्यांनी महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि गुंडाराज यांसारख्या मुद्द्यांवरही प्रकाश टाकला.

कॅप्टन विरियातो यांनीही महिलाशक्तीच समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकते असे सांगत, सरकारच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या अपयशी मोहिमेवर टीका केली. तसेच, पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारची निष्क्रियता दाखवून दिली. “२०२७ मध्ये महिलाच एकजुटीने परिवर्तन घडवून आणतील,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

त्यांनी गोव्यातील भ्रष्टाचाराच्या पातळीवरही प्रकाश टाकला आणि सांगितले की, आता सरकारी नोकऱ्याही लाखो रुपयांना विकल्या जात आहेत. त्यांनी सांगितले की, वास्को येथील एका वकिलाच्या मुलाने जीपीएससी परीक्षेत यश मिळवले, पण त्याला नोकरी हवी असल्यास ८० लाख रुपये द्यावे लागतील असे सांगण्यात आले. वकिलाने पैसे देण्यास नकार दिला आणि ही नोकरी नंतर एका आरटीओ अधिकाऱ्याच्या मुलाला देण्यात आली.

“जर आरटीओ अधिकाऱ्याने एवढे पैसे दिले असतील, तर त्याने किती कमावले असावे आणि त्याचा मुलगा हे सर्व जाणून नोकरी मिळवतोय, तर तो पुढे काय करणार? हा भ्रष्ट साखळदंड आता तोडला पाहिजे,” असे ते म्हणाले.

या बैठकीचा समारोप, महिला काँग्रेसला ब्लॉक पातळीवर बळकट करण्याचा आणि महिलांच्या हक्कांसाठी व चांगल्या शासनासाठी न थांबता संघर्ष करण्याच्या निर्धाराने करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button