Uncategorized

अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात लंडनला जायला निघालेलं एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर अवघ्या 5 मिनिटांतच कोसळलं

अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात लंडनला जायला निघालेलं एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर अवघ्या 5 मिनिटांतच कोसळलं 

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघाताचे वृत्त समोर आले आहे. आज गुरुवारी (12 जून) दुपारी गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad Plane Crash) येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले, या घटनेचे भयानक फोटो समोर येत आहेत.अहमदाबादमधील मेघानीनगर भागात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसून येत आहेत, तर धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत. अहमदाबाद विमानतळावरून (Ahmedabad Plane Crash) विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांतच मेघानीनगरजवळ कोसळले. विमानतळापासून मेघनीनगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. घटनेनंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली. या विमानात 242 प्रवासी होते. सर्वांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.(Ahmedabad Plane Crash)

विमानाचे तुकडे तुकडेप्राथमिक माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. विमानतळाच्या सीमेजवळ हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या सुरुवातीच्या फोटोंमध्ये विमानाचे तुकडे तुकडे झाल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओनुसार अपघात झालेल्या विमानाचा एक पंख तुटून पडला आहे असे दिसत आहे.अग्निशमन दलाचे जवान पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या आग काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा विमान विमानतळावरून उड्डाण घेत होते. हे विमान एअर इंडियाचे आहे, अशी माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button