Uncategorized
दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व भाजपा दोडामार्ग तालुकाध्यक्ष दिपक गावस वीज समस्ये बाबत आक्रमक

दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व भाजपा दोडामार्ग तालुकाध्यक्ष दिपक गावस वीज समस्ये बाबत आक्रमक
दोडामार्ग :- तालुक्यातील वीज समस्ये बाबत नेहमीच आक्रमक भुमिका घेणारे दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व भाजपा दोडामार्ग तालुकाध्यक्ष दिपक गवस यांच्या आग्रही भूमिकेला वीज वितरण ने मान देत जंगल भागात असलेली विद्युत वितरणची मुख्य लाईन आज रस्त्याच्या कडेला टाकण्यास सुरुवात केली. सदरचे काम टप्प्या टप्प्याने होणार असून आज दोडामार्ग ग्रामीण रुग्णालया पासून याची सुरुवात करण्यात आली, याबाबत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले असून पावसात वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आपण नेहमीच आक्रमक राहू असे म्हटले आहे.