Uncategorized

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसार डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे निधन..

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसार डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे निधन..

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसार डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे निधन..

पुणे : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि वि ज्ञानप्रसार डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पुण्यातील राहत्या घ निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञानविश्वावर शोककळ पसरली आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नारळीकर झोपेतचा शांतपणे अनंतात विलीन झाले. त्यांना कोणतीही दीर्घ आजारपण नव्हते, मात्र वयोमानानुसार प्रकृती काहीशी खालावली होती. त्यांच्या निधनामुळे वैज्ञानिक, साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा मावळला आहे.
डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळवली. याशिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांनी पटकावली आहेत.विविध महत्वपूर्ण पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button