११मे रोजी फोंड्यातील मर्दनगडावर पदभ्रमण व संभाजी जयंती कार्यक्रम

११मे रोजी फोंड्यातील मर्दनगडावर पदभ्रमण व संभाजी जयंती कार्यक्रम
फोंडा :- मर्दनगड आभियान फोंडा, गोवा मराठी अकादमी फोंडा तालुका समिती , अपरांत अस्मिता , विद्या वृद्धी संस्था आणि मर्दनगड स्पोर्टस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११मे रोजी फोंड्याच्या इतिहासाची साक्ष असलेल्या मर्दनगडावर पदभ्रमणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्त साधून सदर कार्यक्रमाद्वारे मर्दनगडाचा इतिहासाची ओळख सर्वसामान्य आणि विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून असे अनेक उपक्रम अयोजकांतर्फे राबवले जातात.
६ डिसेंबर १६८३ साली छत्रपती संभाजी महाराजांनी नागझर फोंडा येथील जर्जर झालेला कोट किल्ला मर्दनगडावर स्थलांतरीत केल्याची नोंद गोमंतकाच्या इतिहासात वाचायला मिळते. कालांतराने मर्दनगडावर अनेक राजवटी आल्या आणि शेवटी पोर्तुगीजांनी स्वताच्या सुरक्षे साठी मर्दनगड पाडून त्याचे दगड जुना बोरी पूल बांधण्या साठी वापल्याचीही नोंद सापडते व फोंड्याहून शिरोडा जाताना जुन्या बोरी पुलाची कमान त्याची साक्ष देत अजून उभी आहे.
मर्दनगड विषयी अधिक माहीती जाणून घेण्या साठी प्रत्यक्ष मर्दन गडाला भेट देण्याची संधी या गडभ्रमण कार्यक्रमाद्वारे सर्वांना लाभणार आहे.
रविवार ११मे रोजी पहाटे ६ः३० वाजता शांतीनगर फोंडा येथील कीड्स नेस्ट शाळेकडे एकत्रित होऊन , वनखात्याच्या संकुलातून मर्दन गडावर पदभ्रमणाची सुरुवात केली जाईल .
याकार्यक्रमात इतिहास अभ्यासक सहभागी होऊन माहीती देणार असून जिज्ञासू इतिहास प्रेमी व विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी त्वरीत नावनोंदणी करणे .नाव नोदणी आणि अधिक माहीतीसाठी संपर्क क्रमांक 7020277123 ,9823228882.असे अयोजकांतर्फे नीलेश नाईक आणि अभित शिरोडकर यांनी आवाहन केले आहे.