गोळीबाराला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर

Breaking News
गोळीबाराला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर
:- उरी, कुपवाडा, तंगधारमध्ये दोन्ही बाजूने गोळीबार सुरु आहे. भारत पाकिस्तानवर सीमेवर सध्या मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु आहे. होथियापूरमध्ये पाकिस्तानची मिसाईल पाडण्यात आली आहेत. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मोठा स्फोट झाला आहे. जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. या गोळीबाराला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आला त्यात २६ पर्यटकांना ठार करण्यात आलं. त्या हल्ल्याचं उत्तर देत भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. मात्र यानंतर पाकिस्तानकडून होणारी आगळीक थांबलेली दिसत नाही. ज्यानंतर आता भारताने जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला कुठल्याही परिस्थितीत माफ करणार नाही अशी भूमिका भारताने घेतली आहे. याच संदर्भातले लाईव्ह अपडेट्स जाणून घेऊ ब्लॉगच्या माध्यमातून.