बनावट विमानतिकिट दाखवून प्रवेश करणाऱ्या मानुयेल केवीन आजुकेना डिसोझा (वय २९, रा. सांकवाळ) या तरुणाला अटक

बनावट विमानतिकिट दाखवून प्रवेश करणाऱ्या मानुयेल केवीन आजुकेना डिसोझा (वय २९, रा. सांकवाळ) या तरुणाला अटक
दाबोळी : येथील विमानतळावर बनावट विमानतिकिट दाखवून प्रवेश करणाऱ्या मानुयेल केवीन आजुकेना डिसोझा (वय २९, रा. सांकवाळ) या तरुणाविरुद्ध दाबोळी विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मानुयेल हा कामानिमित्त गोव्यातून मुंबई आणि पुढे बार्सेलोना या मार्गे प्रवास करण्याच्या तयारीत होता. मात्र त्याच्याकडील तिन्ही विमानतिकिटे बनावट असल्याचे चौकशीत उघडकीस आले.
ही घटना मंगळवारी (दि. ६) दुपारी ३ च्या सुमारास घडली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांना संशय आल्याने त्यांनी मानुयेलला टर्मिनलच्या प्रतिबंधित क्षेत्रात थांबवून चौकशी केली. त्यानंतर ही माहिती अधिकाऱ्यांकडे देण्यात आली. CISF अधिकाऱ्याने तात्काळ दाबोळी पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिस तपासात मानुयेलने ‘एअर इंडिया’च्या मुंबई-गोवा विमानाचे बनावट तिकीट सादर करून टर्मिनलमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे