विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या दोन महिला अधिकाऱ्यांनी कारवाई केली

विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या दोन महिला अधिकाऱ्यांनी कारवाई केली
दिल्ली :- पहलगाम इथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ६ मेच्या रात्री पाकिस्तानच्या पीओजेकेवरील ९ दहशतवादी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. साधारण २५ मिनिटांत भारतीय लष्कराने ही कारवाई केली असल्याची माहिती लष्कराच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आणि त्याचं कारणही तसंच होतं. पहलगाममधील या हल्ल्यात पुरूषांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. त्यांच्यासोबत असलेल्या अनेक महिलांचे कुंकू पुसले गेले. या महिलांचा आक्रोश संपूर्ण जगाने पाहिला होता. याच कारणाने या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले.
विशेष म्हणजे, भारतीय लष्कराने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांनी या ऑपरेशनबाबत माहिती दिली आहे. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या दोन महिला अधिकाऱ्यांनी लष्कराने केलेल्या या कारवाईबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे. ही कारवाई कुठे, कशी पार पाडली गेली याची सविस्तर माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.