Uncategorized
कोणत्याही बाहेरील भाविकांना श्री लईराई मंदिरात प्रवेश प्रवेश नाही..

कोणत्याही बाहेरील भाविकांना श्री लईराई मंदिरात प्रवेश प्रवेश नाही..
पणजी : शिरगाव : देवी लईराईच्या जत्रेमध्ये घडलेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जत्रेच्या पाचव्या दिवशी, म्हणजेच उद्या, ‘चौगुले’ घराण्याचे भाविक वगळता इतर कोणत्याही बाहेरील भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष दीनानाथ गांवकर यांनी दिली.
या निर्णयामुळे मंदिर परिसरात होणारी गर्दी नियंत्रणात ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तसेच, चेंगराचेंगरीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मंदिर परिसर ते दुर्घटनास्थळापर्यंत उभारण्यात आलेले सर्व स्टॉल्स उद्या (सोमवार) दुपारपर्यंत हटवण्याचे स्पष्ट निर्देश मामलेदारांना देण्यात आले आहेत.
“भाविकांची सुरक्षितता हेच आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे जत्रेच्या उर्वरित कार्यक्रमांमध्ये आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना राबवण्यात येतील,” असे गांवकर यांनी स्पष्ट केले. प्रशासन आणि मंदिर समिती एकत्रितपणे परिस्थिती हाताळत असून, पुढील निर्णय परिस्थितीच्या आढाव्यानंतर घेतले जातील.