Uncategorized

मुफ्त डायलिसिस पेशंट ट्रान्सपोर्ट सेवा — रोटरी क्लब म्हापसा एलेगन्सचा समाजसेवेतील आणखी एक मोलाचा टप्पा

मुफ्त डायलिसिस पेशंट ट्रान्सपोर्ट सेवा — रोटरी क्लब म्हापसा एलेगन्सचा समाजसेवेतील आणखी एक मोलाचा टप्पा…

म्हापसा :- आजचा दिवस रोटरी क्लब ऑफ मापसा एलेगन्ससाठी अतिशय खास आणि अभिमानास्पद ठरला. क्लबच्या The Rotary Elegance Foundation च्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या मुफ्त डायलिसिस पेशंट ट्रान्सपोर्ट वाहन प्रकल्पाचे उद्घाटन आज सायंकाळी मापसा टॅक्सी स्टँड येथे करण्यात आले.

या सेवेद्वारे मापसा आणि परिसरातील गरजू डायलिसिस रुग्णांना त्यांच्या घरापासून उपचार केंद्रापर्यंत आणि पुन्हा घरी येण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा पुरवण्यात येणार आहे. ही सेवा गरजूंसाठी सन्मानाने आणि सुलभतेने उपचार घेण्याचा मार्ग खुले करते.

या प्रकल्पाचे उद्घाटन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नामांकित डॉ. लेनी दा कोस्टा यांच्या हस्ते, मापसा नगरपालिकेच्या अध्यक्षा सौ. प्रिया मिशाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत, आणि सहाय्यक प्रांतपाल अ‍ॅडब्रोना व्हालाडारेस यांच्या साक्षीने करण्यात आले. यावेळी क्लबचे सदस्य, हितचिंतक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रकल्पामागे क्लबचे अध्यक्ष रोटेरियन राज खालप यांची दूरदृष्टी आणि चिकाटी होती. त्यांना रोटेरियन अजय मेनन, सचिव परेश रिवणकर, डॉ. लेनी यांचं सतत पाठबळ लाभलं.

क्लबचे सर्व सदस्य आणि प्रकल्पासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या सर्व प्रायोजकांचे मनापासून आभार. त्यांच्या विश्वासामुळेच ही सेवा प्रत्यक्षात उतरली.

हा प्रकल्प म्हणजे समाजसेवेतील एक समर्पित पाऊल आहे — अशा अनेक गरजू रुग्णांच्या आयुष्यात आशा आणि आधार घेऊन येणारा ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button