करासवाडा म्हापसा येथील कत्तल खान्यावर “एफडीए”चा छापा..

करासवाडा म्हापसा येथील कत्तल खान्यावर “एफडीए”चा छापा..दोन बकऱ्या जप्त…
पणजी : अस्वच्छ किचन,भेसळयुक्त पदार्थ, अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन यासाठी म्हापसा येथील करसवाडा परिसरातील दोन बेकरी वजा अन्न निर्मितीच्या दुकानांना अन्न आणि औषध प्रशासनालयाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
कायदेशीर नियमांचे उल्लंघन झाल्याच्या कारणास्तव त्यांना दंडही ठोठावला आहे.
अन्न आणि औषध संचालनालयाचे मंत्री विश्वजीत राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील नागरिकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ अन्न सुनिश्चित
करण्याची आमची वचनबद्धता कायम आहे. म्हापसा येथील अलंकार टॉकीज जवळील अन्न दुकाने नियमांचे पालन न करणाऱ्यांबद्दलच्या अधिकारी सफिया खान यांच्या पथकाने तपासणी केली असता दोन विक्रेत्यांना आवश्यक परवानग्यांशिवाय काम करताना आढळून आले , लगेचच त्यांना ही दुकाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले असून अन्न सुरक्षा कायदा, २००६ च्या कलम ६९ अंतर्गत दंड आकारण्यात आला. करसवाडा येथील एका सुप्रसिद्ध बेकरीच्या बेस किचनलाही अस्वच्छ परिस्थितीमुळे कामकाज स्थगित करण्यास सांगण्यात आले आहे. ही जलद कारवाई अन्न सुरक्षा मानके राखण्यासाठी आणि गोव्यातील लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आमची वचनबद्धता दर्शवते. असेही त्यांनी म्हंटले आहे.
बातमीनंतर, नियुक्त अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखालील एफडीए पथकाने अमित मांद्रेकर, लेनिन डेसा आणि अन्न सुरक्षा