तेरेखोल किनारी पोलिसांचा वाळू उपसा करणाऱ्यावर छापा…

तेरेखोल किनारी पोलिसांचा वाळू उपसा करणाऱ्यावर छापा…
पेडणे :- तेरेखोल किनारी पोलिसांनी उपनिरीक्षक योगेश शिरोडकर आणि पोलिस शिपाई आदित्य शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी नईबाग पेडणे येथे तेरेखोल नदीत गस्त घालत असताना बाळू उपसा करणाऱ्यांवर छापा टाकला व बेकायदा वाळू उपसा करण्यासाठी वापरलेली वाळूसह एक होडी आणि उपकरणे जप्त केली.
या कारवाईत ५ घनमीटर वाळू जप्त केली असून त्याची एकूण किंमत रुपये २.६ लाख आहे. कायदा,बेकायदा रेती काढणारी होडी जप्त केली आहे.
कायदा आणि खाण आणि खनिज कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तेरेखोल नदीत मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उत्खनन करनाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारल्याचे नाटक होत आहे.
रेती व्यावसायिक महिन्याकाठी लाखो रुपये सरकारी यंत्रणेला देतात. एखाद्या वेळी कारवाई करुन आपण कारवाईचा बगडा उगारल्याचे नाटक कोस्टल पोलिसांकडून होत असल्याचे दिसून येत आहे. नदीचे संरक्षण करण्यासाठी खास तेरेखोल येथे पोलिस चौकी उभारली आहे. मात्र संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांकडून या रेती व्यावसायिकांना आशीर्वाद मिळत आहे. यासाठी महिन्याला हजारो रुपये प्रत्येक होडी मागे या कोस्टल पोलिसांना तसेच सरकारच्या संबंधित यंत्रणेला देण्यात येत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
Reply