मोपा गावात घरफोड्यांचे सत्र कायम; ग्रामस्थांची पोलीसांकडे टेहाळणीची मागणी

मोपा गावात घरफोड्यांचे सत्र कायम; ग्रामस्थांची पोलीसांकडे टेहाळणीची मागणी
मोपा: मोपा गावात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनांमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी मोपा पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देत रात्रीच्या वेळी पोलीस टेहाळणी वाढवण्याची मागणी केली आहे.
गावातील विविध भागांमध्ये रात्रीच्या सुमारास घरफोडी होऊन मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याच्या घटना समोर येत आहेत. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून चोरट्यांचा छडा लावावा व गावात गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
या निवेदनादरम्यान माजी सरपंच रुपेश परब, तसेच दशरथ परब, प्रभाकर परब, सर्वेश परब, राजन गावस, साईश परब, शिवप्रसाद सावंत, सदानंद परब, घोडूराज परब व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने रात्रीच्या वेळेस पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक प्रशासन व पोलिसांनी योग्य ती दक्षता न घेतल्यास घरफोड्यांचे प्रमाण अधिक वाढू शकते. त्यामुळे प्रभावी उपाययोजना करून गावात शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.