डॉ. तारक आरोलकर यांची गोवा राज्यासाठी (MOEFCCPC) चेअरमनपदी नियुक्त

- डॉ. तारक आरोलकर यांची गोवा राज्यासाठी (MOEFCCPC) चेअरमनपदी नियुक्त
पणजी :- पर्यावरण, वन व जलवायु परिवर्तन संवर्धन परिषद ईकाई (भारत) यांनी डॉ. तारक आरोलकर यांची गोवा राज्यासाठी चेअरमन (MOEFCCPC) म्हणून नियुक्ती केली, तर सरोजबा राहेवर यांची व्हाईस चेअरमन (MOEFCCPC) म्हणून नेमणूक करण्यात आली. या नियुक्तीची घोषणा डायरेक्टर कौन्सिल लक्ष्मण लोहाना यांनी एका विशेष कार्यक्रमात बोलताना सांगितल
कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डायरेक्टर कौन्सिल लक्ष्मण लोहाना यांनी संस्थेच्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “विकासाच्या दृष्टीने वाटचाल करताना अनेकदा नकळत निसर्गाचे नुकसान होते. उदाहरणार्थ, हॉटेल्समध्ये वापरले जाणारे एसी थंड हवा निर्माण करतात, पण त्याच वेळी बाहेरील वातावरण गरम करतात. यावर उपाय म्हणून प्रत्येक हॉटेलने एक झाड लावावे, असा नियम आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आमची संस्था यावर लक्ष ठेवेल. हॉटेल मालकांच्या सहकार्याने झाडे लावण्याचा आणि ती जगवण्याचा प्रयत्न केला जाईल.”
याशिवाय, जलप्रदूषण, जंगलतोड आणि पर्यावरणीय असमतोल रोखण्यासाठी संस्था कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. तारक आरोलकर यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की पर्यावरण संरक्षण: प्रदूषण, जंगलतोड आणि जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडते. त्यामुळे संरक्षण आवश्यक आहे.
जलवायु परिवर्तनाचा प्रभाव: वाढते तापमान, अनियमित पाऊस, समुद्र पातळी वाढ, पूर आणि दुष्काळ यांसारख्या समस्या यामुळे निर्माण होतात. वनसंवर्धन: झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यास मदत करतात.नवी आरोग्य: शुद्ध हवा, पाणी आणि अन्न मिळवण्यासाठी स्वच्छ पर्यावरण आवश्यक आहे.
आर्थिक आणि सामाजिक लाभ: पर्यावरणपूरक धोरणे रोजगारनिर्मितीला चालना देतात आणि शेती व पर्यटन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
“समाजात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे, शाश्वत जीवनशैली स्वीकारणे आणि पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावले उचलणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.
गोव्याच्या पर्यावरण विकासासाठी कटिबद्ध
डॉ. तारक आरोलकर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत, समृद्ध भारत, सक्षम भारत, विकसित भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही गोव्यातील नागरिकांच्या सहकार्याने काम करू. हेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही ध्येय आहे, आणि ते पूर्ण करण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करीन.”हा नियुक्ती सोहळा EDC कॉम्प्लेक्स, हॉटेल नोवाटेल येथे पार पडला.