
चलन देण्याचा अधिकार आता पोलिसांना नाही…
पणजी : स्थानिक आणि पर्यटकांना होणारा नाहक त्रास टाळण्यासाठी गृह खात्याने महत्वपूर्ण पावले उचलली असून यापुढे दिवसभरात चलन देण्याचा अधिकार केवळ पोलीस निरीक्षकाला, तर रात्रीच्यावेळी पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांनाच असेल. इतर पोलिसांना चलन देण्याचा अधिकार नसेल, तसा प्रयत्न कुणी केल्यास त्या पोलिसाचा फोटो संबंधित पोलीस स्थानकाला पाठवा. त्याला निलंबित करू. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
भारतीय न्याय दंड संहितेच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पोलीस महानिरीक्षक ओमवार ओमवीरसिंग, मुख्य सचिव कांडावेलू, वाहतूक पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते.
मख्यमंत्री पुढे म्हणाले, वाहतूक उल्लंघनासाठी डॅश कॅमेरा, सिग्नल कॅमेरा, एआयव्दारे ‘तालांव’ चलन) देण्यात येईल तेही दिवसा पीआय आणि रात्रीच्यावेळी पीआयएस हेच तालांव देतील, पोलिस पैसे मागत असल्यास त्यांचे फोटो काढून पाठवा त्यांना निलंबित करतो. एकूणच गृहखात्याच्या या पुढाकारामुळे पोतिकडून घेतल्या जाणाऱ्या पैशांकर चाप बसणार आहे.
तर दुसरीकडे पोलिसांची होत असलेली नाहक बदनामीही थांबणार आहे पर्यटन क्षेत्रात केल्या जाणाऱ्या बदलाविषयी मुख्यमंत्री म्हणाले, या पुढे किनारपट्टीवर अनेक निर्बन्ध घालण्यात आले असून भिकारी, विविध प्रकारच्या वस्तू विक्री करणारे विक्रेते, मसाज करणारे लोक, एजंट (टाऊट्स) यांच्यावर पूर्णता बंदी घालण्यात आली असून यापुढे त्यांना केवळ सूचना देऊन सोडण्यात येणार नाही. तर तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येईल.
वक्फ बिल मंजूर केल्याबद्दल केंद्राचे आभार
गरीब मुसलमानांच्या हितासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन मंजूर केलेल्या वक्त बोडांच्या बिलासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. ते म्हणाले राज्यात अशा प्रकारचे बोर्ड अथवा जमिनी अस्तित्वात नाहीत. मात्र केंद्राने मंजूर केलेले बिल मुस्लिम समाज बांधवांसाठी हिताचे आहे.