शिवोली काँग्रेस ब्लॉक कमिटीची बैठक
पार्वती नागवेकर यांनी ब्लॉक अध्यक्षपदवर कायम आसावे, आसा निर्णय

पार्वती नागवेकर यांनी ब्लॉक अध्यक्षपदवर कायम
शिवोली :-शिवोली काँग्रेस ब्लॉक कमिटीची बैठक २६.०३.२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिवोली काँग्रेस ब्लॉक अध्यक्षा श्रीमती पार्वती नागवेकर यांनी शापोरा येथे बोलावली होती. या बैठकीत सर्व सदस्य उपस्थित होते.
प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य श्री. राजेश कोचरेकर आणि शिवोली मतदारसंघ प्रभारी श्री. प्रदीप देसाई बैठकीला उपस्थित होते. बैठकीदरम्यान बलभीम मालवणकर, अॅलेक्स नोरोन्हा, कपिल कोरगावकर, टॉमस माचेडो, प्रदीप नाईक, जॉन डिसोझा, सुनीता गोलतेकर हे देखील उपस्थित होते. बैठकीत शिवोली काँग्रेस ब्लॉकशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
सर्व सदस्यांनी ब्लॉक अध्यक्षा श्रीमती पार्वती नागवेकर यांच्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या आपले मत व्यक्त केले. पार्वती नागवेकर यांनी ब्लॉक अध्यक्षपदवर कायम आसावे, आसा निर्णय घेण्यात आला.बैठकीत विविध मुद्द्यांवरचर्चा झाली आणि बूथवरील नवीन सदस्यांची तसेच समिती सदस्यांची नावे वाचून दाखवण्यात आली.आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चर्चा पुढे ठेवण्यात आली.