केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली गोव्यातील तिन्ही रेल्वे स्थानक केवळ क्रॉसिंग स्थानक आहेत…
निर्णय केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचा

केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली गोव्यातील तिन्ही रेल्वे स्थानक केवळ क्रॉसिंग स्थानक… मुख्यमंत्री
पणजी : केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली गोव्यातील तिन्ही रेल्वे स्थानक केवळ क्रॉसिंग स्थानक आहेत….आहेत. प्रवाशांसाठी हे थांबे असणार नाहीत. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिली. या रेल्वे स्थानकांपैकी मये वगळता अन्य दोन रेल्वे स्थानकाबद्दल नागरिकांमध्ये असंतोष आहे. यात नेवरा, मांडूर आणि सालझोरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. याबाबत आमदार वीरेश बोरकर यांनी सरकारला प्रश्न विचारला होता. याबाबत उत्तर देताना वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, हे सर्व प्रस्ताव कोकण रेल्वेचे असून जुने आहेत. त्यामुळे हे प्रकल्प लोकांवर लादण्याचा प्रश्नच येत नाही. हा निर्णय केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचाआहे. हे तिन्ही रेल्वे स्थानक निर्माण झाल्यास वाहतूक सुरळीत आणि कमी वेळेत होणार आहे. त्यामुळे याला होणारा विरोध चुकीचा आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सध्या रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे वाहतूक अधिक महत्वाची आहे. आणि ती झाल्यास वाहतुकीचा त्रास कमी होईल. आणि प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करणे सोयीस्कर ठरणार असल्याचे मुखमंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नला उत्तर दिले.
आपली काँग्रेस सोबतच आघाडी – सरदेसाई
आपण निवडणुकीपूर्वीच काँग्रेस सोबत आघाडी केले होती. त्यामुळे काँग्रेस आपला नैसर्गिक साथीदार आहे. त्यामुळे या अधिवेशनात आपण काँग्रेससोबत असल्याची माहिती गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली आहे. विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते यावरून संयुक्त विरोधक एकत्रित राहतील असेही ते म्हणाले.
मी महाराष्ट्रवादी पक्षाचाच.. आमदार जीत आरोलकर
आपण महाराष्ट्रवादी गोमंतक अर्थात मगोपचा आमदार असून भाजप’ जॉईन’ करण्याचा कोणताच प्रस्ताव आपल्यासमोर नाही, असे मत मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली. विधानसभा अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर आरोलकर पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष मोठी करण्याचा अधिकार आहे. ते, त्या पद्धतीने करत राहतात. गोव्यातील ४० ही मतदार संघात आपले उमेदवार आणि आमदार असावेत असे प्रत्येक पार्टीला वाटते, त्यात वावगे काही नाही. सध्या तरी आपण मगोपचे आमदार असून भाजपमध्ये जाण्याचा प्रस्ताव नाही असेही आरोलकर म्हणाले.
सभापती रमेश तवडकर नैसर्गिक न्यायाप्रमाणे वागत नाहीत….. विरोधी नेते युरी आलेमाव
गोव्यातील भाजप सरकार हे भ्रष्टाचाराचे आगार असून सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार माजला आहे. त्यात सभापती रमेश तवडकर नैसर्गिक न्यायाप्रमाणे वागत नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे. विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. आलेगाव पुढे म्हणाले, सभापती कोणत्याच पक्षाचे नसतात. ते नैसर्गिक न्यायाप्रमाणे वागले पाहिजेत. गोव्यात केवळ तीन दिवसांचे अधिवेशन आहे. इतर राज्यामध्ये मोठी अधिवेशना असतात. गोव्यात मात्र सभापर्तीकडून अधिवेशनाच्या वेळेबाबत कोणताच निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे ते नैसर्गिक न्यायाने वागत नाहीत असे दिसून येते असा आरोपही त्यांनी यावेळी केला.