मंत्रीमंडळ फेर बदलावावर निर्णय शक्य… प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री दिल्लीत..
केंद्रीय नेतृत्वातील विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू

मंत्रीमंडळ फेर बदलावावर निर्णय शक्य… प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री दिल्लीत..
मुखमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची योग्य प्रकारे सांभाळतअसून त्याच्या कार्यकिर्दीला सहा वर्षे पूर्ण होत असल्याने प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा
पणजी : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळातील फेरबदलाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्ली गाठत केंद्रीय नेतृत्वातील विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे.
काल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून आज ते भाजप सरचिटणीस बी. एल. संतोष, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अन्य नेत्यांबरोबर चर्चा करण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत सोमवारी रात्री नियोजित कार्यक्रमासाठी दिल्लीला रवाना झाले. काल मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीला जाणे पसंत केल्यानंतर राजकीय चर्चाना वेग आला. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांनी माहिती मिळवणे सुरू केले. तर दुसरीकडे मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू मिळणार हे निश्चित नसल्याने मंत्रिमंडळात खळबळ माजली. याबाबत अंतिम निर्णय झालेला नसला, तरी तो निर्णय आज होण्याची शक्यता असून विधानसभेच्या येत्या अधिवेशनापूर्वी किंवा अधिवेशन झाल्यानंतर मंत्रिमंडळातील फेरबदल होऊ शकतात अशी माहिती आहे.