भौतिक शास्त्र विभागाचा प्राद्यापक अखेर निलंबित
गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हिरालाल मेनन यांनी काढला आदेश

भौतिक शास्त्र विभागाचा प्राद्यापक अखेर निलंबित
पणजी : आपल्या मैत्रिणीसाठी इतर सहकारी प्राध्यापकांचे लॉकर बनावट किल्ल्यांच्या साहाय्याने फोडून पेपर चोरल्याप्रकरणी गोवा विद्यापीठातील विज्ञान विद्या शाखेतील भौतिक शास्त्र विभागाच्या प्रा. प्रवण पी. नाईक याला निलंबित करण्यात आले आहे. तसा आदेश आज गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हिरालाल मेनन यांनी काढला. नाईक याच्या विरोधात आगाशी पोलीस स्थानकामध्ये तक्रार झाली होती.
पेपरचोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर काशिनाथ शेट्ये यांच्यासह अन्य चार जणांनी आगशी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करत ४८ तासात चौकशी करून गुन्हा नोंदविण्यास आग्रह धरला होता. अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे म्हणाले होते.
शासनावर जोरदार टीका
दुसरीकडे अभाविप, एनएसयुआय, गोवा फॉरवर्ड विद्यार्थी विभाग या विद्यार्थी संघटनांसह काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड पक्ष आदी राजकीय पक्षानी जोरदार टीका करत आक्षेप नोंदवला होता. याबरोबरच अभाविप या विद्यार्थी संघटनेने कुलगुरूंना घेराव घालत विद्यापीठात निदर्शने केली. यावर कुलगुरू प्राध्यापक मेनन यांनी संबंधित प्रणव नाईक या सहाय्यक प्राध्यापकाल निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी एक विशेष समिती स्थापन केली असून ४८ तासात या समितीला सविस्तर अहवाल देण्यास निर्देशित केले आहे.