अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळातील फेरबदल ?

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळातील फेरबदल ?
पणजी : विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चेला वेग आला आहे. यात अनेक बदल होण्याची शक्यता असून अनेकांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. याबाबत आज सभापती रमेश तवडकर यांनी येत्या पंधरा दिवसात निर्णय होईल, असे सांगितले आहे यावर अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल अशो प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जास्त काळ राज्यात चर्चेला जात असणारा मुद्दा म्हणजे मंत्रिमंडळातील फेरबदल होय. येत्या २४ मार्चपासून विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. प्रमोद सावंत मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची
दिगंबर काम काम मायकल लोबो यांच्यासह पहिल्यांदा निवडून आलेले संकल्प आमोणकर, दिलायला लोबो त्यांची शक्यता आहे. याबाबत सभापती तवडकर यांनी याला दुजोरा दिला आहे. तर दुसरीकडे सभापती तवडकर माजी मंत्री कामात, लोबो आणि आमोणकर यांना मंत्रिमंडळात घेतले जागार असल्याची माहिती आहे
लोकसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल करत पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यांना वगळून त्यांच्या जागी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले होते. हा बदल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला होता. मात्र त्याचा दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीमध्ये फारसा फायदा झाला नाही. उलट सिक्वेरा यांच्या मतदारसंघातून भाजपला चांगली मते मिळाली नाहीत, शिवाय नुकत्याच झालेल्या भाजप सदस्यता मोहिमेत त्यांचा मतदारसंघ मागे राहिला आहे. त्यामुळे सिक्वेरा यांच्या कामगिरीवर पक्षामधून नाराजी आहे. त्यामुळे त्यांची उचलबांगडी होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या जागी निलेश काब्राल यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.