खनिजांच्या उत्खनासाठी लिलावाचा शुभारंभ
खनिजांचा शोध घेणाऱ्या कंपन्यांना केंद्रीय खाण खात्यांकडून परवाने

खनिजांच्या उत्खनासाठी पाचव्या लिलावाचा शुभारंभ
पणजी : केंद्र सरकारच्या खाण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या क्रिटिकल खनिजांच्या उत्खनासाठीच्या पाचव्या लिलावाची प्रक्रिया आज गोव्यातून करण्यात आला. यावेळी केंद्रीय खाण मंत्री जी. किसन रेट्टी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खाण सचिव कांताराव, गोव्याचे मुख्य सचिव व्ही कांडावेलू उपस्थित होते. यावेळी प्रथमच दिल्लीबाहेर क्रिटिकल खनिजांच्या लिलावाची प्रोसेस सुरू करण्यात आली. यासोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्याने खनिजांचा शोध घेणाऱ्या विविध कंपन्यांना केंद्रीय खाण खात्यांकडून परवाने देण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले खनिज व्यवसायामुळे राज्यांच्या आणि देशाच्या विकासाला हातभार लागतो. त्यामुळे खनिज उत्खनन हे देशासाठी महत्त्वाची बाब आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्याने राज्यातही अशा प्रकारे खनिजांचा शोध घेतला जाऊ शकतो.
‘सरकारचे धोरण जनतेचा विकास’: जी. किशन रेड्डी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या सरकारने खनिज धोरणाच्या संदर्भात विविध बदल केले आहेत. या बदलांमुळे आता हा व्यवसाय सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाला आहे. याचा फायदा या क्षेत्रात असलेल्या खनिज उद्योजकांनी घेतला पाहिजे. सरकारचे धोरण जनतेचा विकास, असून यात उद्योजकांनी हातभार लावल्यास या प्रक्रियेला प्रोत्साहन मिळणार आहे.