Uncategorized

श्री क्षेत्र पींगुळी येथील श्री राउळ महाराज संस्थान येथे ११ ते १३ मार्च अण्णा महाराज जयंती महोत्सव

हजारो गोमंतकीयांचे श्रद्धा स्थान असलेले श्री क्षेत्र राउळ महाराज संस्थान

श्री क्षेत्र पींगुळी येथील श्री राउळ महाराज संस्थान येथे ११ ते १३ मार्च अण्णा महाराज जयंती महोत्सव

मोपा (उमेश शंकर गाड)  :- दक्षिणेतील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील हजारो गोमंतकीयांचे श्रद्धा स्थान असलेले श्री क्षेत्र राउळ महाराज संस्थान येथील
गौरी शंकर मंदिराचा ३० वा वर्धापनदिन सोहळा तसेच प. पू. सद्‌गुरू समर्थ अण्णा महाराज यांचा ८० वा जयंती सोहळा
मंगळवार दिनांक ११ मार्च बुधवार, १२ मार्च व गुरुवार दिनांक १३ मार्च २०२५ असे तीन दिवस भरगच्च कार्यक्रमानीशी साजरा होणार आहे, या निमित्ताने धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

मंगळवार दि. ११ मार्च २०२५ रोजी
पहाटे ०५.३० वा.नित्य काकड आरती
सकाळी ७.०० ते ९,०० वा.समाधी पूजन सार्वजनिक अभिषेक इत्यादी धार्मिक विधीनी कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे दुपारी १२.३० वा. महाराजांची नित्य महमहाआरती व त्यानंतर महाप्रसाव सायं. ०४.०० वाजता राउळ महाराजांच्या भक्तांनी सादर केलेला सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम होईलसायं. ६.वाजता नित्य सांजआरती वरील ७वाजता श्री ची पालखी मिरवणूक होईल त्या नंतर महाप्रसाद व ठीक१० वाजता
सुप्रसिद्ध कीर्तन कार ह.भ.प. श्री. भाऊ नाईक वेतोरे यांचे सुश्राव्य किर्तन होईल बुधवार दि १२ मार्च रोजी पहाटे ५ वाजता नित्य काकड आरती परीसरातील सर्व मंदिरात अभिषेक पुजादी धार्मिक विधी व नंतर

समाधी मंदिरात समाधी पुजन सार्वजनिक अभिषेक नामस्मरण दुपारी १२ वाजता महाराजांची महाआरती १ ते ०३.०० वा. पर्यंत महाप्रसाद त्या नंतर मनोरंजनात्मक विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील सायंकाळी ६ वाजता नित्य सांजआरती रात्री ८ वाजता
श्री. प. पू. राऊळ महाराज भक्त मंडळ मुंबई यांचे सुश्राव्य भजन होईल
भाग्योदय मित्रमंडळ गांगोची राई कसाल यांचा खास आकआकर्दिंडीचे आगमन होईल ठीक १० वाजता श्री. देव वेतोबा रवळनाथ बाळगोपाळ मित्रमंडळ कुशेगाव परूळे. वेंगुर्ला यांचे आकर्षक गोफनृत्याचा विशेष कार्यक्रम होईल व त्या नंतर ठीक बारा वाजुन दोन मीनीटानी प. पु. स. स. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा भक्त भाविक उपस्थितीत जयंती उत्सव सोहळ्यास प्रारंभ होईल व अण्णा महाराजाच्या मुर्ती स ८१ दुव्याने व ८० सुहासिनी ची ओवाळून या कार्यक्रमास प्रारंभ होईल
: गुरूवार दि. १३ मार्च २०२५ रोजी पहाटे ५ वाजता नित्य काकड आरती
प.पू. स. समर्थ राऊळ महाराज समाधी पूजन व सार्वजनिक महाअभिषेक होईल
त्या नंतर गौरीशंकर मंदिराचा३० वा. वर्धापन दिनाचे औचित्य साधुन मंदिरात लघुरूद्र होईल तसेच प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरिटॅबल ट्रस्ट पिंगुळी व रोटरी क्लब, कोल्हापुर यांच्या संयुक्त विद्यामाने कर्णबधीर रुग्णांची मोफत तपासणी शिबीर. आयोजित केले आहे
१० :३० वाजता
पू. विनायक (अण्णा) महाराज पादुका वर अभिषेक व पुजन होईल त्या नंतर महाआरती तीर्थ प्रसाद झाल्यावर
. ४५ लाभार्थी अपंगांना मोफत कृत्रिम जयपुर फुटचे वाटप करण्यात येईल. त्या नंतर पु. सद्गुरू राऊळ महाराज समाधी स्थानी श्रींची महाआरती
त्यानंतर अखंड महाप्रसाद दुपारी १ वाजता
श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ मुंबईचे प्रसिद्ध गायक श्रीकांत शीरसाट व सहकारी यांच्या भजनाचा कार्यक्रमा होईल

त्यानंतर ३:३० वाजता श्री. भालचंद्र बाबा प्रासादिक भजन मंडळाचे भजन

ठीक ६ वाजता सांजआरती
नंतर परीसरात तील गौरीशंकर मंदिर, श्री. सद्‌गुरू राऊळ महाराज समाधी मंदिर आणि श्री. अण्णा महाराज समाधी मंदिर व अन्य मंदिरात आरत्या चा कार्यक्रम होईल
ठीक ८ वाजता श्री विठ्ठल रखुमाई वास्करी भजन मंडळ कालवीबंदर ता- वेंगुर्ला या नामवंत भजन मंडळाचे न व ठीक १० वाजता मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे याचा उद्धार भैरवाचा अर्थात देवी वैष्णवी हा महान पौराणिक नाट्य प्रयोग सागर केला जाईल गोमंतकातील सर्व राउळ भक्त व भाविकानी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री राउळ महाराज संस्थान ने केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button