राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, गोवा यांच्या वतीने कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या विरोधात म्हापसा पोलिसात तक्रार
सामाजिक सलोखा आणि शांतता यांना धोका

राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, गोवा यांच्या वतीने कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या विरोधात म्हापसा पोलिसात तक्रार
म्हापसा :- छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या विरोधात राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, गोवा यांच्या वतीने ५ मार्च या दिवशी म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, गोवा यांनी या तक्रारीत म्हटले आहे की, साहित्यिक उदय भेंब्रे यांनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी खोटे, निराधार आणि विकृत ऐतिहासिक तथ्ये सादर करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.यामुळे सामाजिक सलोखा आणि शांतता यांना धोका पोहोचवून जातीय तणाव वाढवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करण्यात आला आहे.
साहित्यिक उदय भेंब्रे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांच्या हेतुपुरस्सर खोट्या प्रचाराला आळा घालावा.पोलिसात तक्रार दाखल करताना राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, गोवा यांच्या शिष्टमंडळामध्ये अधिवक्ता सुनील शिरसाट, अधिवक्ता सुशांत धावसकर, अधिवक्ता गावस, अधिवक्ता सुधांशू मोरजकर, अधिवक्ता यश नाईक आदींचा समावेश होता.