बी. एल. संतोष गोव्यात…प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले स्वागत…
राजकीय वर्तूळात खलबते... नेतृत्व बदलाची शकता..

सरचिटणीस – बी. एल. संतोष गोव्यात…. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले स्वागत…
पणजी :- भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष आज गोव्यात दाखल झाले असून विमानतळावर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. बी संतोष यांचा दौरा हा पक्ष संघटन आणि पुढील महिन्यात होणाऱ्या महिला भाजपाच्या अधिवेशनाच्या तयारीसाठी असला तरी राज्यातील मंत्रिमंडळातील फेरबदल थास अनेक मुद्द्यांवर त्यांच्याबरोबर चर्चा होणे अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत काल भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीकरता दिल्लीत होते. या दरम्यान त्यांनी भाजपचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली असल्याची माहिती आहे. तर आज दुसरीकडे संतोष गोव्यात आल्याने राजकीय चर्चाना वेग आला आहे.
सदर प्रामुख्याने भाजपच्या संघटनात्मक कामांवर लक्ष देणार असले, तरी बी. एल. संतोष यांचे भाजपमधले स्थान वरच्या पातळीवरचेआहे. त्यांचा शब्द अंतिम शब्द मानला जातो. त्यामुळे राज्यातील प्रशासकीय कामकाज, मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे कामकाज आणि मंत्रिमंडळातीलफेरबदल यासंबंधी चर्चा होणे अपेक्षित आहे.
सुरुवातीला ही चर्चा पक्षपातळीवर होईल, आणि त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी ते चर्चा करतील. त्यानंतरच केंद्रीय कमिटीकडून या कामाबाबत हिरवा कंदील मिळेल. तूर्तास संघटन कामावर लक्ष दिले जाईल असे सांगण्यात येत आहे.
मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या दरम्यान माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी मंत्री मायकल लोबो यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यापूर्वी आमदार संकल्प आमोणकर, दिलायला लोबो यांच्या नावाची चर्चा होती. त्याबरोबरच सभापती रमेश तवडकर निलेश काब्राल यांनाही मंत्रिमंडळात यावयाचे आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचीही चर्चा होते. आता नेमकी काय चर्चा होईल, हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.