
सर्व महाजन, भक्तजन आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार
धारगळ :- श्री देवी शांतादुर्गेच्या कृपेने घुमटाच्या पुनर्बांधणी व नवीन शिखर कलशारोहणाचे पवित्र कार्य यशस्वीपणे पूर्ण झाले असल्याची माहिती देवस्थानाचे अध्यक्ष राज खलप यांनी दिली.
या कार्याच्या यशस्वीतेमध्ये उदारमनाने योगदान देणाऱ्या भक्तगणांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या श्रद्धेने व सहकार्यानेच हे महत्त्वाचे कार्य पूर्ण करता आले असून समर्पित भक्तगणांचे मनःपूर्वक आभार!
तसेच, या ऐतिहासिक क्षणाला अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दिलेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार!
या विशेष प्रसंगी *स्मरणार्थ १० ग्रॅम चांदीचे नाणे* प्रकाशित करण्यात आले आहे. भक्तगणांचा जबरदस्त प्रतिसाद पाहता आनंद होत आहे केवळ काही तासांतच १०० नाणी बुक झाली आहेत.. वाढती मागणी पाहता, समिती आणखी १०० नाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ज्यांना हे स्मरणिक नाणे हवे आहे त्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी.
याशिवाय गेल्या तीन वर्षांपासून अथक परिश्रम करणाऱ्या समितीतील सर्व सदस्यांचे देखील विशेष आभार. त्यांच्या समर्पणामुळेच हे कार्य यशस्वीपणे पूर्ण झाले.