शिवरायाबद्दल अपमानास्पद शब्द..शिव भक्त आक्रामक.. भेंब्रे यांनी माफी मागावी
बजरंग दलाच्या सेवकांचा घेराव

शिवरायाबद्दल अपमानास्पद शब्द..शिव भक्त आक्रामक.. भेंब्रे यांनी माफी मागावी
पणजी : पोर्तुगीजांच्या राजवटीत छत्रपती शिवाजी महाराजांचा गोव्याशी काय संबंध ? असे वक्तव्य केल्याप्रकरणी मडगावच्या उदय भेंब्रे यांच्या विरोधात राज्यात शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काल रात्री बजरंग दल आणि हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे गोव्यातील अतुलनीय कार्य सर्वश्रुत आहे. बहुतांश इतिहास संशोधकांनी त्यावर भाष्य केले
आहे. त्यांच्या कार्याचे शिलालेख, ताम्रपट आणि लिखित दस्तऐवज आजही विविध संग्रहालयांमध्ये उपलब्ध आहेत. पोर्तुगीज धर्मांतराच्या विरोधात त्यांनी पुकारलेले लढा आणि पोर्तुगीजांना शिकवलेला धडा इतिहासात अजराअमर ठरला आहे. असे असताना भेंब्रे यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करत गोव्याशी त्यांचा काय संबंध ? गोव्यातील धर्मांतर रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा सहभाग नव्हता. असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे गोव्यातील शिवप्रेमींनी त्यानी माफी मागावी अशी मागणी केली आहे.