केएडब्ल्यू बेलॉस मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड अर्थात केव्हीएमपीएलच्या व्यवसायाची नवी श्रेणी..
गोव्यातील रायडर्सना ऑस्ट्रियन ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटालियन व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध

केएडब्ल्यू बेलॉस मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड अर्थात केव्हीएमपीएलच्या व्यवसायाची नवी श्रेणी..
शब्द मीडिया : केएडब्ल्यू बेलॉस मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड अर्थात केव्हीएमपीएलच्या व्यवसायाची नवी श्रेणी असलेल्या मोटोहाउसने गोव्यामध्ये आपली चौथी डिलरशिप उघडत भारतातील आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. ऑटोझोन इनकॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीसोबत भागीदारी करत सुरु केलेल्या या नव्या डिलरशिपमुळे गोव्यातील रायडर्सना ऑस्ट्रियन ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटालियन व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध होतील.
ब्रिक्स्टन मोटरसायकल्सच्या हाय-परफॉर्मन्स बाईक्समध्ये क्रॉसफायर ५०० एक्स, क्रॉसफायर ५०० एक्ससी, क्रॉमवेल १२०० आणि क्रॉमवेल १२०० एक्स यांचा समावेश आहे. जागतिक स्तरावर नावाजलेल्या या मोटरसायकल्स उत्कृष्ट बांधणी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना आहेत. मोटोहाउसची व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर ही शहरी चालकांसाठी अत्यंत सोयीस्कर पर्याय असून ही पर्यावरणपूरक देखील आहे.
ब्रिक्स्टन मोटरसायकल्स बाईक प्रेमीना आधुनिक सुरक्षा प्रणाली आणि प्रगत वैशिष्ट्यांचा बेजोड मिलाफ मिळवून देते. यातील एबीएस सुरक्षा प्रणाली, एलईडी लायटिंग, ब्रेम्बो पॉवर्ड जे. जुआन ब्रेक तंत्रज्ञान, पूर्णपणे अॅडजस्टेबल केवायवी सस्पेन्शन या बाईक्सची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या बाईक्स शहरात चालवण्यासाठी, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी किंवा साहसी सहलीसाठी बनविण्यात आल्या असून अद्वितीय रायडिंग अनुभव देतात.
तर, व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर शाश्वत गतिशीलतेसाठी व वाहतुकीसाठी खास तयार करण्यात आली आहे. हलके आणि मजबूत चेसिस, मोठे टायर, रिमूव्हेबल बॅटरी, कॅन्टीलिव्हर सस्पेन्शन, तीन रायडिंग मोड्स आणि १३० किमी मर्यादा ही याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे हे वाहन गोव्याच्या वर्दळीच्या रस्त्यांवर सहजतेने चालवण्यासाठी आणि शहराच्या पर्यावरण पूरक उद्दिष्टांना पूरक आहेत.
व्यवसाय विस्तार हाच केवळ मोटोहाउसचा उद्देश नसून, भारतातील रायडिंग अनुभवाची परिभाषा बदलणे हे आमचे ध्येय आहे. आमचे उद्दिष्ट नवीन तंत्रज्ञान आणि आमच्या व्यवसायाचा समृद्ध वारसा घेऊन येणाऱ्या जागतिक दर्जाच्या दुचाकी भारतीय रायडर्सना उपलब्ध करून देणे आहे. प्रत्येक नवीन डिलरशिपसह, आम्ही उत्तम कार्यक्षमता, शाश्वतता आणि ग्राहक समाधान या तत्त्वांना मजबूत करत आहोत. गोवा आमच्यासाठी एक महत्वाची बाजारपेठ असून आम्ही या शहराच्या बाईर्किंग संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होण्यास उत्सुक आहोत, असे केव्हीएमपीएल-मोटोहाउसचे व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके म्हणाले.
मोटोहाउसचे हे नवीन शोरूम १००० चौरस फूटमध्ये विस्तारले असून यात ५०० चौरस फूटचे वर्कशॉप देखील आहे. ग्राहकांना सहज आणि आकर्षक अनुभव देण्यासाठी यात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मोटोहाउस विक्रीनंतर मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि वॉरंटी सुविधांच्या माध्यमातून ग्राहकांचा वाहन मालक होण्याचा अनुभव अधिक सुलभ बनवते, ब्रिक्स्टन मोटरसायकल्समध्ये २ वर्षांची स्टैंडर्ड वॉरंटी आणि अतिरिक्त २ वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी उपलब्ध आहे तर, व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटरसोबत २ वर्षांची वाहन वॉरंटी आणि ३ वर्षांची बॅटरी वॉरंटी मिळते.
मोटोहाउस २०२५ च्या मध्यापर्यंत भारतभर २० नवीन डिलरशिप सुरू करण्याच्या तयारीत आहे. मुंबई, पुणे, चेन्नई, मैसूर, हैदराबाद, रायपूर, दिल्ली, जयपूर आणि गोवा यासारख्या प्रमुख शहरांमध्ये लवकरच व्यावसायिक विस्तार होणार आहे. कंपनीने पहिल्या वर्षी १०,००० वाहन विक्रीचे लक्ष्य ठेवले असून, बुकिंग आणि डिलिव्हरी सुरू झाल्या आहेत.