Uncategorized

गोव्यातील भाजप सरकार एसटी समाजाला संविधानाने दिलेल्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचा  कट रचत असल्याचा आमदार सरदेसाई यांनी यांचा आरोप 

जुलमी पक्षाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन

गोव्यातील भाजप सरकार एसटी समाजाला संविधानाने दिलेल्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचा  कट रचत असल्याचा आमदार सरदेसाई यांनी यांचा आरोप 

पणजी : गोवा फॉरवर्ड पार्टीचे (GFP) अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी एसटी समाजाच्या कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्या अटकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, काणकोणकर हा गुन्हेगार नसून मूळ गोमंतकिय आहे, ज्याला न्याय नाकारण्यात आला आणि मुख्यमंत्री कार्यालयाविरोधात बोलण्यास भाग पाडण्यात आले.

“सावंत यांच्या पोलिसांनी एसटी समाजाच्या कार्यकर्त्याला डोक्यावर बुरखा घालून फिरवले, हे पाहून मी धक्का बसलो आणि व्यथित झालो! रामा काणकोणकर हा गुन्हेगार नाही, तर एक मूळ गोमंतकीय आहे, ज्याला न्याय नाकारला गेला आणि मुख्यमंत्री कार्यालयाविरुद्ध बोलण्यास भाग पाडण्यात आले,” असे सरदेसाई यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे वर्तन सरंजामशाही आणि दडपशाही करणारे असल्याचा आरोप करत सरदेसाई म्हणाले की, “गोवा हे कुणाची खासगी जहागिरी नाही, तरीही पोलिसांनी केवळ काणकोणकर यांना अटकच केली नाही तर संपूर्ण देशासमोर त्यांचा आणि त्यांच्या समाजाचा अपमान केला.”हा प्रकार म्हणजे “एक अन्याय” असून “गोव्यातील भाजप सरकार एसटी समाजाला संविधानाने दिलेल्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचा नियोजनबद्ध कट रचत आहे,” असा आरोप सरदेसाई यांनी केला.सरदेसाई यांनी सर्व “सजग गोमंतकीयांना” या “अलोकशाही, आएसटी समाजविरोधी आणि गोमंतकविरोधी कृत्याचा” निषेध करण्याचे आवाहन केले. तसेच “केवळ पैशावर आणि सामाजिक वर्चस्वावर विश्वास ठेवणाऱ्या या जुलमी पक्षाविरोधात एकत्र यावे,” असेही ते म्हणाले.

या घटनेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, तर विरोधी पक्षांनीही सरकारवर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, गोवा पोलिसांनी या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
[23/02, 9:20 am] Kamlakar… Shabd: एसटी समाजाच्या कार्यकर्त्याना अपमानस्पद वागणूक आणि अन्याय आमदर विजय सरदेसाई यांचा तीव्र निषेध..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button