२७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडं हस्तगत
अफूची झाडे

शेतात कांदा, लसणाची लागवड आणि चहूबाजूने मक्याचं उत्पादन. गुप्त माहितीवरुन तपास केला आणि भलतंच समोर आलं. घटनेनंतर पोलिसांनी केली कारवाई..
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील न्हावी गावामध्ये शेतीमालात अमली पदार्थ निर्मीतीसाठी विनापरवाना अफुची लागवड करणाऱ्या तिघांना वालचंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीच्या सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाच्या चाळीस गोण्या बोंडासह अफुची झाडं हस्तगत करण्यात करण्यात आली. अंमली पदार्थ निर्मितीसाठी विनापरवाना अफुची शेती करणारे रतन कुंडलिक मारकड वय ५० वर्षे, बाळु बाबुराव जाधव, वय ५४ वर्षे, कल्याण बाबुराव जाधव वय ६५ वर्षे तिघेही (रा. न्हावी ता. इंदापूर जि. पुणे) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने गस्त घालत असताना शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हवालदार स्वप्निल अहीवळे यांना मौजे न्हावी (ता. इंदापूर जि. पुणे) गावच्या हद्दीत वरील रतन मारकड आणि बाळू जाधव या आरोपींनी त्यांच्या मालकीच्या शेतात बेकायदेशीरपणे विनापरवाना अफुच्या झाडांची लागवड, विक्री करणेच्या उद्देशाने उत्पादन घेतल्याची गोपनीय बातमी मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वरील आरोपींच्या शेतामध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केली होती.