Uncategorized

मार्च महिन्यातील विधानसभा अधिवेशनात फक्त तीन दिवसांचे कामकाज

अधिवेशनाची कालावधी कमी केल्याने निषेध

भाजप विरोधकांच्या प्रश्नांना घाबरत असल्याने पुन्हा कमी कालावधीचे अधिवेशन….. युरी आलेमाव

पणजी: भ्रष्टाचार, कमिशन, गैरव्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने भाजप विरोधकांच्या प्रश्नांना घाबरत आहे आणि यासाठी मार्च महिन्यातील विधानसभा अधिवेशनात फक्त तीन दिवसांचे कामकाज असणार आहे असे सांगून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, राज्यावर याचा परिणाम होणार आणि ही चिंतेची बाब आहे.

‘‘मार्चमध्ये केवळ तीन दिवस विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याच्या भाजपच्या निर्णयावरून सरकार विरोधकांना सामोरे जाण्यास घाबरत असून जनतेला न्याय देण्याची जबाबदारी टाळत असल्याचे दिसून येते. असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. पण फेब्रुवारीच्या विधानसभा अधिवेशनाच्या दोन दिवसांच्या कामकाजावेळी आम्ही सरकाराच्या भ्रष्ट काराभारांचा पर्दाफाश केल्याने ते घाबरले आहेत. या निर्णयामुळे लोकशाहीच्या तत्त्वांवर गदा येते आणि आमदारांच्या अधिकारांवर सुद्धा गदा येते, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.

‘‘सभापती रमेश तवडकर यांनी मार्चमहिन्यात दिर्घ कालावधीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावणार असल्याचे माध्यमांना सांगितले होते. प्रसारमाध्यमे त्यांना प्रश्न विचारतात तेव्हा ते प्रत्येक वेळी अशी आश्वासने देतात, पण मग ते आपले शब्द पाळण्यात अपयशी ठरतात. कारण त्यांचे मंत्री भ्रष्टाचार आणि कमिशनमध्ये गुंतलेले आहेत,’’ असे आलेमाव म्हणाले.

‘‘कॅश फॉर जॉब, जमीन रूपांतरण, सुलेमान सिद्दीकी प्रकरण, म्हादई, अपघात यावर चर्चा करण्याचे धाडस ते करतात का? विरोधकांना सामोरे जाण्यास आणि समाजीक कार्यकर्त्यांनाही सामोरे जाण्यास भाजप घाबरत आहे, म्हणून त्यांनी सत्तेचा गैरवापर करून रामा काणकोणकर यांना तुरुंगात पाठवले आहे. गोव्याची जनता या हुकूमशाही सरकारला माफ करणार नाही, असे आलेमाव म्हणाले.

‘विधानसभेचे अधिवेशन कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा मी निषेध करतो. विधानसभेच्या अधिवेशनाच्या या तीन दिवसांतही संयुक्त विरोधक या भ्रष्ट सरकारचा पर्दाफाश करतील,’’ असे आलेमाव म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button