राज्यातील राजकीय आणि पक्षोष प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचे केंद्रीय संघटन मंत्री बी. एल, मंतोषगोव्यात
संतोष यांच्या गोवा भेटीला विशेष महत्त्व आले. आहे.

- राज्यातील राजकीय आणि पक्षोष प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचे केंद्रीय संघटन मंत्री बी. एल, मंतोषगोव्यात
पणजी: राज्यातील राजकीय आणि पक्षोष प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचे केंद्रीय संघटन मंत्री बी. एल, मंतोष यांच्यासह तीन सदस्य शिष्टमंडळ २१ फेब्रुवारी रोजी गोव्याच्या भेटीवर येणार असून, ते दोन दिवस विविध बाबीचा आढावा घेणार आहेत. यात मंत्रिमंडळातील फेरबदल, उपमुख्यमंत्री पद, भाजपचे संघटन, राज्य कार्यकारणी अशा विविध मुदधांवर चर्चा आणि कृती करतीत, त्यामुळे भाजप अंतर्गत आणि सरकार पातळीवरील राजकारण पुन्हा एकदा वेगवान झाले आहे.
सद्या राज्यांतर्गत कार्यकारणी आगि संघटन मजबूत करण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठीच केंद्रीय संघटन मंत्री श्री एल, संतोष आपल्या अन्य दोन सहकाऱ्यासह #1 फेब्रुवारी रोजी गोव्यात येत आहेत. दोन वर्षाहून अधिक काळ रेगाळलेला विषय म्हणजे मंत्रिमंडळातील फेरबदल होय. काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या बहुतांश आमदारांना अपवाद वगळता कोणतीच पदे मिळालेली नाहीत. त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चिला जात असून संतोष याबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. याच वेळी राज्य कार्यकारणी जाहीर केली जाणार असून, या कार्यकारणी मध्ये २०२७ निवडणुकीच्या प्रचाराची रूपरेषा ठरणार असून जबाबदान्याही निश्यिा केल्या जाणार आहेत. त्यामुळे संतोष यांच्या गोवा भेटीला विशेष महत्त्व आले. आहे.