
आरोपी विकट भगत याला जन्मठेप!
शब्द मीडिया,मडगाव :- राजबाग – काणकोण येथील आठ वर्षांपूर्वी २०१७ मध्ये घडलेल्या ब्रिटिश – आरिश युवती डॅनियल मेकाग्लीन (२८) हिच्या खून प्रकरणी आरोपी विकट भगत (वय ३१) याला दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश क्षमा जोशी यांनी आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच ३०२ खून, बलात्कार ३७६ व २०१ पुरावे नष्ट करणे या कलमाखाली प्रत्येकी २५ हजार रुपये मिळून ७५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
राज्यभर गाजलेली ही खुनाची घटना १४ मार्च २०१७ रोजी काणकोण येथे घडली होती. कानपूर पोलिसांनी विकेट बघितला तातडीने अटक करत तपास केला होता त्यानंतर गेली आठ वर्षे यावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेर शुक्रवारी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. आज न्यायालयाने विकट भगतला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी पोलिसांकडून ४६ साक्षीदारांच्या जबान्या नोंदवल्या होत्या.
कधी झाला होता खूनबलात्कार व खुनाची ही घटना १४ मार्च १०१७ रोजी घडली होती.
त्यानंतर काणकोण पोलिसांनी जलद गतीने ब्रिटिश युवतीच्या खुनाचा तपास लावून आरोपीला अटक केली होती. त्या दिवसापासून आरोपी कोलवाळच्या तुरुंगात आहे. २८ वर्षीय ब्रिटीश युवती २०१६ मध्ये गोव्यात पाळोळे किनाऱ्यावर आली होती. त्यावेळी तिची किनाऱ्यावरच आरोपीशी ओळख झाली होती. नंतर त्यांच्या मैत्रीचे कधी प्रेमात रुपांतर झाले हे एकमेकांना कळलेच नाही. ती दोघे एकमेकांना प्रेमी युगुल मानत होते, त्याच संबंधाने वागत होते. त्यावेळी ब्रिटिश युवती व्हिसा संपल्याने आपल्या देशात गेली. आपण दुसऱ्या वर्षी येऊन आरोपीशी लग्न करणार आणि त्यानंतर त्याला घेऊन ब्रिटनला घेऊन जाणार असे आश्वासनही ब्रिटीश युवतीने आरोपीला दिले होते.
ब्रिटीश युवती २०१७ मध्ये गोव्यात येऊन तिने आश्वासनपूर्ती केली. नंतरच्या काळात ब्रिटीश युवती मागच्या वर्षीप्रमाणे आपला प्रियकर आरोपी सोबत फिरू लागली. पाळोळे किनाऱ्यावरील लोक त्यांना देश विदेशी प्रेमीयुगुल म्हणून ओळखत होते. दिवसभर किनाऱ्यावर समुद्रस्नान करून रात्रीच्यावेळी मद्यपानाच्या पार्चा करणे त्यांचा नित्याचाच कार्यक्रम होता. १३ मार्च २०१७ च्या मध्यरात्री ब्रिटिश युवती व आरोपी बीयरच्या बाटल्या व पार्टीचे सामान घेऊन राजबाग येथे निर्जनस्थळी गेली. तिथे बसून दोघांनी भरपूर मद्यप्राशन केले. त्यानंतर आरोपीने दारूच्या नशेत आपल्या ब्रिटिश प्रेयसीशी शारीरिक सुखाची मागणी केली असता तिने त्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने तिच्याशी हुज्जत घातल्याने दोघांची झटापट झाली. अखेर आरोपीने ब्रिटिश प्रेयसीवर लैंगिक अत्याचार केले. आरोपी एवढ्यावरच थांवला नाही. बियर बॉटल्सने तिच्या डोक्यावर प्रहार केला. १४ मार्च रोजी सकाळी राजबाग येथे ब्रिटीश युवतीचा रक्तबंबाळ, नग्रावस्थेत मृतदेह सापडला होता.