Uncategorized
सत्ताधारी गटातील अंतर्गत वादामुळेच राजकारणातील धुसफुसीमुळेच राजीनामा..
सत्ताधारी गटातील अंतर्गत वादामुळेच राजीनामा..

सत्ताधारी गटातील अंतर्गत वादामुळेच राजकारणातील धुसफुसीमुळेच राजीनामा..
शब्दशारदा :- म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षपदाचा डॉ. नूतन बिचोलकर यांनी शुक्रवारी नगरपालिका प्रशासन संचालनालयकडे राजीनामा सुपूर्द केला. सत्ताधारी गटातील अलिखित करारानुसार आपण पायउतार होत असल्याचा बिचोलकरांनी दावा केला असला तरी, भाजपाप्रणित सत्ताधारी गटातील अंतर्गत वाद व धुसफुसीच्या राजकारणामुळे तसेच सत्ताधारी गटाच्या सापत्न वागणुकीमुळेच बिचोलकर यांना पायउतार होणे भाग पडले. दरम्यान, स्थानिक आमदार तथा उपसभापती यांनीही बिचोलकरांना नगराध्यक्षपद सोडण्याची सूचना केली होती.
- यासंदर्भात प्रतिक्रिया देताना डॉ. नूतन बिचोलकर यांनी माध्यमांसमोर सांगितले की, नगराध्यक्षपदाचा राजीनामा मी नगरपालिका प्रशासन संचालनालयकडे सुपूर्द केला आहे. सत्ताधारी गटातून मला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, तसेच वारंवार प्रतिमा व प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न केला गेल्या तीन महिन्यांत पालिका मंडळाच्या बैठका वारंवार तहकूब मोठा परिणाम झाला, अहो बिचोलकर म्हणाल्या. यातून सारी अंतर्गत वाट चव्हाट्यावर आल
- त्या म्हणाल्या की, हेतूपुरस्सर माझ्यावर बिनबुडाचे चुकीचे आरोप करण्यात आले. यात पालिकेतील नोकरभरती असो किंवा बाजारपेठेतील दुकानांचे नूतनीकरणाचा विषय मुळात नोकरभरती या कायद्याच्या चौकटीत केली गेली. यात कुठलाच वैयक्तिक नव्हता. राहिला प्रश्न, दुकानांच्या नूतनीकरणाचा, तर नूतनीकरण व हस्तांतरण या दोन शब्दांची फेरफार करुन माझ्यावर चुकीचे आरोप करण्यात आले. सर्व गोष्टींमध्ये पारदर्शकता ठेवली असताना, मला अकारण लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप बिचोलकर यांनी केला.
- दरम्यान, माझ्या वर्षभराच्या कारर्किदीत अनेक विकास प्रकल्प पूर्णत्वाकडे आले. तसेच स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविले गेले. जवळपास ३५ ब्लॅक स्पॉट (कचऱ्याचे ठिकाण) सुशोभीकरण केल्याचे त्या म्हणाल्या