कोकणातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला गुरुवारी मोठा झटका
विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत झालेला पराभव मान्य
उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ असलेले राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेकोकणातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला गुरुवारी मोठा झटका यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राजन कोकणातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला गुरुवारी मोठा झटका यांनी भावनिक भाषण केले. तसेच माध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काय हवे? ते ही सांगितले. राजन साळवी विधान परिषदेत पाठवले जाणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहे. त्यावर राजन साळवी यांनी स्पष्ट केले.
एका डोळ्यात दु:खाचे अश्रू, दुसऱ्या डोळ्यात आनंदाअश्रू
राजन साळवी म्हणाले, ९ फेब्रुवारी रोजी मी एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांच्याकडे शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मला कुटुंबात घेण्याची तयारी दर्शवली. आज माझ्या दोन्ही डोळ्यात अश्रू आहेत. ३८ वर्ष शिवसेनेत असताना नगरसेवकापासून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. या संपूर्ण वाटचालीत तो पक्ष सोडून नवीन घरात यावे लागत आहे, त्यामुळे एका डोळ्यात दु:खाचे अश्रू आहेत. दुसऱ्या डोळ्यात आनंदअश्रू आहे. कुटुंबात परत येत आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत जावू शकलो नाही, ही खंत आहे. पण त्या वेळी वेगळी परिस्थिती होती.