सुदिन ढवळीकर यांना मंत्रिपदावरून बाजूला करा : अॅड. शैलेश गावस

सुदिन ढवळीकर यांना मंत्रिपदावरून बाजूला करा: अॅड. शैलेश गावस
म्हापसा ( प्रतिनिधी): ऊर्जा मंत्री सुदिन ढवळीकर यांना मंत्रीपदावरून बाजूला करा. स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर जनतेच्या माथी मारून वीज ग्राहकांची लुबाडणूक कशासाठी, असा सवाल अॅड. शैलेश गावस यांनी केला आहे.
स्मार्ट मीटर गोवेकराना परवडणार नाही. तुम्हाला हवे ते करू नका. जनतेचा विचार करा. जास्त बिल आले तर वीज ग्राहकांना कसे परवडेल, असा सवाल त्यांनी केला. जे इंडस्ट्रीजवाले आहेत. किंवा जे श्रीमंत वीज ग्राहक आहेत त्यांची थकलेली वीज बिले पहिली वसुली करा,असे सांगून सरकारने स्मार्ट मीटरला परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
प्रीपेड बिलाबाबत बोलताना ते म्हणाले, प्रीपेड कसे काय शक्य आहे. प्रीपेड कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. प्रीपेड मोबाईलला शक्य आहे, पण ते बिलासाठी शक्य होणार नाही. स्मार्ट इलेक्ट्रिक मिटरला जनतेचा विरोध आहे. स्मार्ट मिटरबाबत सरकारने जनतेचा विचार करावा. लोकांना त्रास देऊ नये. खाज एकीकडे आणि खाजवता दुसरीकडे असे का, असा सवाल त्यांनी केला.
सुदिन ढवळीकर यांना मंत्री पदावरून बाजूला करा, त्यांची आम्हाला गरज नाही. अशी आमची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी आहे, असे ते म्हणाले.
मीटरचे पैसे आधी भरून घेतलेले आहेत. आता पुन्हा मीटरचे पैसे कसे घेता. तुम्हाला हवे ते करू नका. तसे आम्ही करू देणार नाही. गरीब लोक स्मार्ट मिटरचे पैसे कसे काय भरतील, असा सवाल त्यांनी केला. सुदिन ढवळीकर माती विकून पैसे कमवणारा मंत्री आहे. सुदिन ढवळीकर खूप हुशार आहे. तो काहीही करू शकतो त्यामुळे स्मार्ट मिटर जनतेच्या माथी मागणार्या सुदिन ढवळीकर यांना मंत्री पदावरून बाजूला करा, अशी मागणी अॅड. शैलेश गावस यांनी केली आहे.