बेकायदेशीर सावकारी करणार्या लोकांना सोडणार नाही.. अॅड. शैलेश गावस यांचा इशारा

बेकायदेशीर सावकारी करणार्या लोकांना सोडणार नाही…. अॅड. शैलेश गावस यांचा इशारा
म्हापसा ( प्रतिनिधी): गरीब लोक काही कामासाठी सावकाराकडून पैसे घेतात. सावकार लोक महिना 12 टक्के, 15 टक्के व्याजाने पैसे देतात आणि गोरगरिबांची फसवणूक करतात. गरिबांना दमदाटी करून त्यांच्या जमिनी लुबाडतात. गरिबांची ही छळवणूक थांबली नाही तर बेकायदेशीर सावकारी करणार्या लोकांना सोडणार नाही, असा इशारा अॅड. शैलेश गावस यांनी दिला आहे.
हे सावकार लोक गरिबांना इतके छळतात की जीव देण्याइतकी परिस्थिती त्यांच्यावर आणतात. ही छळवणूक लवकरच थांबली नाही तर या सावकारी लोकांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अॅड. गावस यांनी दिला आहे.
गोव्यात बेकायदेशीर सावकारी धंदे करणारे पुष्कळ आहेत. त्यांनी तर लोकांची छळवणूक सुरू केली आहे. 5 ते 6 जणांचे टोळके गरिबांच्या घरी जाऊन कोर्या चेकवर सही घेतात व जमिनी लुबाडतात. त्यांना दमदाटी करतात. या टोळीमध्ये काही पोलीसही सामील आहेत. माझ्याकडे एक महिला व एका पुरूषाची तक्रार माझ्याकडे आली आहे. त्या दोघांवरही जीव देण्याची वेळ या बेकायदेशीर सावकारी करणार्या लोकांनी आणली आहे. बॅंका वार्षिक 10 टक्के व्याज आकारतात आणि सावकार लोक महिना 10,12,15 टक्केप्रमाणे व्याज आकारतात. सावकारांकडून गरिबांची होणारी ही पिळवणूक गंभीर बाब आहे. या बेकायदा सरकारी धंदा करून गोरगरिबांची छळवणूक करणार्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे, असे अॅड. गावस म्हणाले.
जमिनीचा व्यवहार करतानाही परवानगी आवश्यक आहे. परवाना नसेल तर जमीन घेऊ शकत नाही. तसा कायदा आहे. जमिनीचा व्यवसाय करीत असाल तर त्याचा हिशेब द्यावा लागतो. सरकारकडे रजिस्टर असेल तरच जमीन विकत घेण्यास परवानगी आहे. मात्र बरेच सावकार गरिबांना धाक दाखवून बेकायदा जमिनी विकत घेत आहेत. अशा लोकांवर पोलिसांनी कारवाई करायला हवी,अशी मागणी अॅड. शैलेश गावस यांनी केली आहे.
ज्या गरिबांवर असा अन्याय होतो, त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक आहे. हे बेकायदा काम करणारे सावकार पुरुष, महिला व मुलांचे अधिकार हिरावून घेऊन त्यांना जगणे मुश्किल करतात. अशा प्रकारे गरिबांना छळणार्या सावकारांना सोडणार नाही.त्यांना जीव द्यायला लावणार. हा इशारा आहे. हे सावकार वठणीवर आले नाहीत तर त्यांच्यावरच जीव द्यायची वेळ येईल, असा इशारा अॅड. शैलेश गावस यांनी दिला आहे.