महाराष्ट्र शासनाची मासेमारी नौकाधारकांसाठी डिझेल प्रतिपूर्ती योजना कार्यान्वित…

महाराष्ट्र शासनाची मासेमारी नौकाधारकांसाठी डिझेल प्रतिपूर्ती योजना कार्यान्वित…
दोडामार्ग: – महाराष्ट्र शासनाने मासेमारी नौकाधारकांसाठी डिझेल प्रतिपूर्ती योजना कार्यान्वित केलेली आहे. यामध्ये नौकाधारकांनी मच्छीमारीसाठी वापरलेल्या डिझेल वरील मूल्यवर्धित कर परतावा देण्यात येतो. 19 जूनच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 मत्स्य सहकारी संस्थांच्या नौका मालकांना 2 कोटी 36 लाख 17 हजार 550 एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
ही रक्कम 23 जून 2025 रोजी पासून जिल्ह्यातील एकूण 300 नौका मालकांच्या खाती तझऊअ प्रणाली अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येत आहे. मे 2025 अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमार नौका धारक यांचा रु. 4 कोटी 36 लाख 5 हजार 815 एवढा डिझेल परतावा प्रलंबित होता.
प्रलंबित रक्कम लवकरात लवकर मंजूर करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने कळविले आहे. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी बंद असताना सदर परतावा अनुदान रक्कम मंजूर केल्याने मासेमार नौकाधारकांनी शासनाचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.