Uncategorized
वारंवार वीज पुरवठा खंडीत.. प्रकरणी वीज कार्यालयाच्या अभियंत्यांना घेराव..

वारंवार वीज पुरवठा खंडीत.. प्रकरणी वीज कार्यालयाच्या अभियंत्यांना घेराव..
दोडामार्ग :- दोडामार्ग तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्या प्रकरणी वीज कार्यालयाच्या अभियंत्यांना घेराव..
गेले तीन दिवस दोडामार्ग तालुक्यात वारंवार पुरवठा खंडीत होत आहे. याबाबत आक्रमक झालेले नगराध्यक्ष चेतन चव्हाण.. सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस.. तालुकाध्यक्ष दीपक गवस.. विनिता घाडी.. सरपंच यांनी उपकार्यकारी अभयंता यांना वारंवार वीज खंडीत होत असल्या प्रकरणी जाब विचारला..
सदर अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आल्याचा आरोप करून असे प्रकार वारंवार घडत राहिल्यास आंदोलन छेडू आसा इशारा या वेळी देण्यात आला…