Uncategorized
सर्व राज्यांमध्ये ७ मे रोजी नागरी संरक्षण मॉक ड्रिल

सर्व राज्यांमध्ये ७ मे रोजी नागरी संरक्षण मॉक ड्रिल
पणजी : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांमध्ये ७ मे रोजी नागरी संरक्षण मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश दिले आहेत.
गोव्यात ही मॉक ड्रिल पणजी (उत्तर गोवा), वास्को, दाबोळी – हार्बर (दक्षिण गोवा) येथे आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिकांना सर्व सूचना आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
या मॉक ड्रिलद्वारे आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची प्रतिक्रिया, यंत्रणांची तत्परता आणि समन्वय तपासला जाणार आहे. ड्रिलदरम्यान अनावश्यक घबराट न करता स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार वागावे, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे.
गृह मंत्रालयाच्या या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये सजगता निर्माण करणे आणि संभाव्य धोक्यांना सामोरे जाण्यासाठी तयार ठेवणे हा आहे.
