मान्सूनची गोव्यातून महाराष्ट्रात वाटचाल…

मान्सूनची गोव्यातून महारष्ट्रात वाटचाल
दोडामार्ग:- मान्सूनची गोव्यातून महाराष्ट्रात वाटचाल होत आहे. अंदाजापेक्षा यंदा मान्सून लवकर दाखल झाला आहे. मान्सूनपूर्व पावसाने कोकणात व महाराष्ट्र अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली. केरळमध्ये अंदाजापेक्षा आठ ते दहा दिवस आधी लवकर दाखल झाला, त्यानंतर मान्सूनचा प्रवास गतीने सुरू होता. त्यानंतर गोव्यात दाखल झाला, तर गोव्यातून आज रविवारी 25 मे रोजी गोव्यातून सिंधुदुर्गात म्हणजेच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरवर्षी महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर मान्सून दाखल होतो. मात्र यंदा मान्सूनने जलदगतीने प्रवास करत महाराष्ट्रात लवकर एन्ट्री केली आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासाला एकंदरीतच अनुकूल वातावरण असल्याने मान्सून यंदा अंदाजित वेळेपेक्षा लवकर आला आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनने धडक दिली. असाच जलदगतीन गतीने प्रवास सुरू राहण्याची शक्यता आहे. एकंदरीतच अनुकूल वातावरण असल्याने कमी दाबाचा पट्टा आधीच तयार झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली
मान्सूनची गती लवकरच सर्व दूर महाराष्ट्रात वेगाने होईल, अशा स्वरूपाची हवामानाची अनुकूल स्थिती आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे हवामान शास्त्रज्ञ प्रा.डॉ. विजय मोरे यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली आहे. येत्या काही तासांत मान्सून मुंबई पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे. लवकरच मान्सूनचा प्रवास हा मराठवाडा, विदर्भ या दिशेनेही सुरु होईल असे सूचित करण्यात येतेय.
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी हे खरिपाच्या शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे मान्सूनच्या आगमानाने बळीराजा आनंदला आहे. दरम्याने मान्सूनच्या आगमनाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.