क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा यांचा टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय.

क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा यांचा टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा ने तात्काळ प्रभावाने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बुधवारी त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर याबाबत माहिती दिली. रोहित शर्मा याने स्पष्ट केले की, तो आता फक्त एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्येच भारताचे प्रतिनिधित्व करेल.
2024 च्या T20 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच, 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियात त्याच्या प्रदर्शनावर आधारित टेस्ट क्रिकेटच्या भविष्यातून सस्पेन्स निर्माण झाला होता. त्यानंतर त्याने टेस्ट क्रिकेटला अलविदा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
“सर्वांना नमस्कार, मला सांगायचं आहे की मी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होतोय. आपल्या देशाचे पांढऱ्या जर्सीमध्ये प्रतिनिधित्व करणे हे एक अत्यंत मानाचे काम होते. या काळात आपल्याकडून मिळालेल्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी मी आभारी आहे. मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत राहीन,” असं रोहित शर्मा यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं आहे..