जुन्या भांडणाच्या रागातून चाकू, सुरा, तलवारीसह राणे कुटुंबावर सशस्त्र हल्ला

जुन्या भांडणाच्या रागातून चाकू, सुरा, तलवारीसह राणे कुटुंबावर सशस्त्र हल्ला…
दोडामार्ग :- मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील आवास येथे फिर्यादी विवेक राणे व जखमी हे त्यांचेकडे असणाऱ्या फोर व्हीलर गाडी मध्ये पावसाचे पाणी जात असल्याने त्यांच्या घरासमोरील शेडमध्ये लावीत असताना जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून गुरुवारी (दिनांक २२ मे २०२५रोजी) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी यांनी जुन्या भांडणाच्या रागातून चाकू, सुरा, तलवारीसह राणे कुटुंबावर सशस्त्र हल्ला करीत शिवीगाळ केली.
वैभव म्हात्रे आणि अंकित राणे यांनी विवेक राणे यांचे भाऊ धर्मेंद्र राणे याला पकडून ठेवले. त्यानंतर देवेंद्र म्हात्रे याने धर्मेंद्र राणे यांच्या छातीमध्ये चाकू भोसकून त्यांना गंभीर जखमी केले. शुभम पाटीलने विश्वासला पकडून आरोपीत अंकित राणे यांना ठारच मारतो, असे बोलून त्याचे छातीत सुद्धा चाकू भोसकला.
फिर्यादी यांना वैभव म्हात्रे यांनी पकडून आरोपीत सिया म्हात्रे यांनी फिर्यादी यांचे पाठीमागे कमरेवर सुरा मारला. त्यावेळी त्यांची आई तिला पकडण्याकरता आली असता, आरोपी पूनम म्हात्रे यांनी फिर्यादी यांचे आईच्या मानेवर सुरा मारून दुखापत केली. यामध्ये धर्मेंद्र नंदुकूमार राणे गंभीर जखमी होऊन मृत पावले आहेत. तसेच विवेक राणे, विश्वास राणे, करुणा राणे हे तिघेजण जखमी झाले असून या तिघांवर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.