सोमवारपासून शाळा सुरु….अधिसूचनेची याचिका फेटाळली
७ एप्रिल रोजी इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू

सोमवारपासून शाळा सुरु….अधिसूचनेची याचिका फेटाळली…
पणजीः राज्य सरकारने एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या काढलेल्या अधिसूचनेला पालक शिक्षक संघांतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा न्यायालयात जनहित याचिकेद्वारा आव्हान देण्यात आले होते. ही जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने सोमवारी ७ एप्रिल रोजी इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होतील.शिक्षण संचालकांने उच्च न्यायालयात सादर केलेले उत्तर मान्य करून सदर न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यंदा पासून इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीला लागू आहे त्यामुळे नवे शैक्षणिक वर्ष येत्या ७ एप्रिलपासून, तर, पहिली ते पाचवी आणि अकरावीचे शैक्षणिक वर्ष येत्या जूनपासून सुरू होईल, त्यामुळे त्यांचे वर्ग जून पासून सुरू होणार आहेत खरेतर १ एप्रिल पासून शाळा सुरू केली जाणार होती पण पालकांनी व्यक्त केलेली काळजी लक्षात घेऊन शाळा ७ एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहेत वर्ग सकाळी ८ वाजल्यापासून ११ वाजे पर्यंतच चालणार आहेत त्या नंतर मुले घरी जाऊ शकतील शाळेत पिण्याच्यापाण्याची व्यवस्था असेल असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते सरकारने घेतलेला निर्णय यशस्वी झाला तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्व प्रथम राबवणारे गोवा हे एकमेव राज्य होईल. याविरोधात् सुमारे ४ हजार हरकती आल्या होत्या, त्यात अनेक मुद्दे एकच होते. त्यामुळे त्याचे खंडन करण्यात आल्याने मूळ याचिकाही फेटाळून लावली होती. पहिल्यांदाच हा प्रयोग होत असल्याने उद्भवणाऱ्या परिस्थितीची जाणीव सरकारला नाही आणि यदा कदाचित विपरीत परिणाम दिसून आल्यास लगेच शाळा बंद ठेऊन जून पासून सुरू करता येतील नेहमी प्रमाणे सर्व मुलांना मे महिन्याची सुट्टी असेलच असे खंडपीठासमोर मांडण्यात आलेआम्हाला आमच्या मुलांची चिंता आहे काही शाळांमध्ये पंख्याची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही अशा परिस्थितीत उन्हाच्या ज्वाळा बाधतील अशी बाजू पालकांच्या वतीने मांडण्यात आली फक्त नंबर वन बनण्याच्या अट्टाहासाने मुलांना वेठीस धरले जाते हम अशी बाजू मांडण्यात आली होती सकाळी ११ पर्यंत तेवढे उन असत नाही त्या नंतर पालकांनी जबाबदारी घ्यायला हवी अशी भूमिका सरकारने मांडली होती दोन्ही बाजू एकूण घेऊन उच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळली आहे