समृद्ध शिवोली यांच्या पुढाकाराने रविवारी ‘मनशाक मरतुकूच वालोर’ तियात्र

समृद्ध शिवोली यांच्या पुढाकाराने रविवारी ‘मनशाक मरतुकूच वालोर’ तियात्र
समृद्ध शिवोली हा एक नवीन सामाजिक ग्रुप असून यात युवा वर्गाचा समाविष्ट करण्यात आला आहे. शिवोलीतील सर्व युवकांना स्वतःच्या पायावर उमे राहण्यासाठी या ग्रुपच्या माध्यमातून कार्यरत असल्याची माहिती पुढे जाणार असल्याची माहिती समाजसेवक कपिल कोरगावकर यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी व्यासपीठावर कौशल पार्सेकर, सेलविन फर्नाडिस, शिक्षक सिरीत रेमोडीयस, अक्षय गोलतेकर, अनिश गोलतेकर कोरगावकर उपस्थित होते.
पुढे बोलताना कपिल कोरगावकर म्हणाले की, जे गरजू विद्यार्थी आहे त्यांना शिक्षणासाठी जी आर्थिक मदत प्रवेश घेण्यासाठी पाहिजे ती मदत या ग्रुपद्वारे करण्यात येते. तसेच गावात जे वयोवृद्ध आहेत त्यांनाही वॉकर आदी अत्यावश्यक मदत देण्यात येते. शिवाय वैद्यकीयदृष्ट्याही मदत करण्यात येते. हेच लक्षात घेऊन शिवोली येथील कलाकार सेलवीन फर्नाडिस यांचे कीर्ती विद्यालयाच्या प्रांगणात तियात्र होणार आहे. म्हणून समृद्ध शिवोती ग्रुपचे पदाधिकारी पुढे येऊन सेलवीनचा तियात्र ‘मनशाक मरतुकूज वालोर हे दि. २० एप्रिल रोजी सादर होणार आहे. तियात्र म्हटले की आमचे दायज ते वाचविण्यासाठी आम्ही सेलवीनला पुढे काढत आहे. या पूर्वी ३० तियात्र राज्यभर झाले असून शिवोलीच्या या युवा कलाकाराप्त्ता सर्वांनी पुढे काढण्यास मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तियात्राचे लेखक तथा शिवोली गावचे सुपुत्र सेलवीन फर्नांडिस म्हणाले की, आपल्या या तियात्राचा ३० वा प्रयोग आहे. आजवर आपले ३० वेगवेगळे तियात्र झाले हे तियात्र इतर तियात्रापेक्षा वेगळे असून समाजाच्या आधारावर हे तियात्र असून येत्या रविवारी सर्वांनी सायंकाळी ७ वा. किर्ती विद्यालयात सर्वांनी या तियात्राचा लाभ घ्यावा असे यावेळी सेलवीन यांनी सांगितले.
यावेळी बोलताना शिक्षक तथा प्रमुख कलाकार सिरील रेमोडीयस यांनी सांगितले की, येत्या रविवार होणारे तियात्र आताच्या समाजात जे काही घडते त्यावर आधारीत आहे. माणूस वयोवृद्ध झाल्यावर त्याला कुणीही आधार देत नाही. स्नुषा, नातवंडे, मुले त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात व वयोवृद्धांच्या घरात नेऊन ठेवतात. व मृत्यूनंतर आम्ही त्यांची मोठी तयारी करतो, सर्वांना बोलावतो मात्र जीवंत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, हे यातून सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे असे रेमोडीयस यांनी सांगितले. यावेळी समृद्धी शिवोलीच्या वतीने समाजसेवक कपिल कोरगावकर यांच्या पुढाकाराने व ज्येष्ठ पत्रकार गिरीश मंद्रिकर यांच्याहस्ते शिक्षक तथा तियात्राचे प्रमुख कलाकार सिरील रेमोडीयस यांचा शाल व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
R
<