Uncategorized

राज्य मागासवर्ग आयोगाकडे २०२१ सालच्या प्रलंबित ओबीसी जात गणनेच्या मागणीसाठी निवेदन

 राज्य मागासवर्ग आयोगाकडे २०२१ सालच्या प्रलंबित ओबीसी जात गणनेच्या मागणीसाठी निवेदन

म्हापसा : म्हापसा येथील भंडारी वॉरियर्स या सामाजिक संस्थेने गोवा राज्य मागासवर्ग आयोगाच्या संचालक/अध्यक्ष यांना निवेदन सादर करून, २०२१ साली होणे अपेक्षित असलेल्या ओबीसी (इतर मागास वर्ग) जात गणनेच्या तातडीने आयोजनाची मागणी केली आहे.

संस्थेने नमूद केले की, अद्ययावत जातनिहाय माहितीच्या अभावामुळे गोव्यातील ओबीसी समाज शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय लाभांपासून वंचित राहत आहे. २०११ साली शेवटची जात गणना झाल्यानंतर अद्ययावत माहिती उपलब्ध नसल्यामुळे योजनांची योग्य आखणी व लाभांचे योग्य वितरण होऊ शकलेले नाही.

यावेळी बोलताना भंडारी वॉरियर्सचे समन्वयक संजय बर्डे म्हणाले, “भंडारी समाजात सध्या दोन गटांमध्ये मतभेद असूनही, हे गट समाजाच्या हितापेक्षा आपल्या राजकीय स्वार्थासाठी कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर भंडारी वॉरियर्सने समाजातील मुलांच्या भविष्यासाठी तात्काळ जात गणना राबवावी, अशी विनंती आयोगाला केली आहे.”

भंडारी वॉरियर्सने स्पष्ट केले की, योग्य व अद्ययावत जातनिहाय माहिती उपलब्ध झाल्यास ओबीसी समाजाला सरकारी सेवा, योजना, शैक्षणिक संधी, नोकऱ्या तसेच राजकीय आरक्षणात योग्य प्रतिनिधित्व मिळू शकते. यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी साधनसंपत्तीचे न्याय्य वितरण शक्य होईल.

या निवेदनप्रसंगी संजय बर्डे (समन्वयक), जनार्दन ताम्ह णकर, वीरेंद्र शिरोडकर, दीपेश नाईक, सुरज नरेश आमोणकर आणि हरीशचंद्र किशननाथ नाईक हे उपस्थित होते.

संस्थेने आयोगाकडे ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी तात्काळ पावले उचलण्याची मागणी केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button