
पुढील दोन दिवस”येलों अलर्ट” जाहीर
दोडामार्ग : जिल्ह्यात पुढील दोन दिवस हवामान विभागाने”येलों अलर्ट” जाहीर केले असून या काळात अवकाळी पावसाची दाट शक्यता दर्शवण्यात आली आहे. जिल्ह्यात ढगाळ बातावरणासह वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
पुढील दोन दिवसात किनारपट्टी भागावर ३० किलोमीटर वेगाने वान वाहण्याची शक्यता आहे. परिणामी मासेमारीवर मोठा परिणाम होणार आहे. तसेच आंबा, काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे आंबा काजू शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. तसेच उष्णतेची लाट वाढत असल्यामुळे या ढगाळ वातावरणामुळे कोकणाच्या वातावरणात बदल झाला आहे पुढील २४ तासात अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाकडून दर्शवली आहे.