Uncategorized
पर्यटनस्थळी दलाली व अनुशासित वर्तनाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

पर्यटनस्थळी दलाली व अनुशासित वर्तनाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई…
पणजी : राज्यात पर्यटनस्थळी दलाली व अनुशासित वर्तनाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. उत्तर जिल्हा पोलिस आणि पर्यटन पोलिस दररोज दलालीसारख्या कृतींवर लक्ष ठेवून आहेत आणि त्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.
अधीक्षक कौशल यांनी सांगितले की, आतापर्यंत उत्तर व दक्षिण गोवा भागात १,००० लोक संशयित म्हणून ओळखले गेले आहेत. यापैकी १९३ जणांवर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आला आहे .५४५ जणांवर सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्याबद्दल कारवाई करण्यात आली, तसेच १४ जणांवर समुद्रकिनाऱ्यावर गाडी चालवल्याबद्दल गुन्हे नोंदवले गेले आहेत.
दलालीच्या कृती सहन केली जाणार नाही..
राज्य आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी देश विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी येतात या पर्यटकांची स्थानिक दलालांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना समोर आले आहेत यासाठीच आता पोलिसाने यांच्या विरोधात कडक कारवाई करत यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे अधीक्षक कौशल यांनी सांगितले आहे