पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली ; बिचोली येथे कँडल लाईट मोर्चा

पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली ; बिचोली येथे कँडल लाईट मोर्चा
बिचोली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बिचोळी येथे कँडल लाईट मोर्चा काढण्यात आला. या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला असून, बिचोलीतील नागरिकांनी एकत्र येत आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात मा. राज्यसभा खासदार श्री. सदानंद तानवडे, मयेचे आमदार श्री. प्रेमेंद्र शेट, बिचोलीचे आमदार श्री. चंद्रकांत शेटे, भाजप बिचोली मंडळ अध्यक्ष डॉ. कौस्तुभ पाटणेकर, बिचोळी नगर परिषद अध्यक्ष श्री. विजयकुमार नाटेकर यांच्यासह नगरसेवक, पंच, पदाधिकारी आणि अनेक नागरिक सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान शोक व्यक्त करत सर्वांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. सर्वांनी एकत्र येऊन ठाम संदेश दिला की, अशा भ्याड आणि अमानुष कृत्यांना माफ केले जाणार नाही आणि समाजाने एकजूट राहून याविरोधात उभं राहिलं पाहिजे