Uncategorized
पेडे ग्राउंड जंक्शनजवळ विजेचा खांब कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

पेडे ग्राउंड जंक्शनजवळ विजेचा खांब कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
म्हापसा :- पेडे ग्राउंड जंक्शनजवळील सर्व्हिस रोडवर आज एक अपघात घडला. एका मालवाहतूक ट्रकच्या मागे विजेची तार अडकली, त्यामुळे विजेचा खांब तुटून रस्त्यावरून जाणाऱ्या मारुती डिझायर कारवर पडला.
या अपघातात गाडीच्या मागील बाजूचा मोठा हिस्सा नुकसानग्रस्त झाला असून काचा फुटल्या आहेत व मागील बोनेट पूर्णपणे दबला आहे. मात्र, सुदैवाने गाडीत केवळ चालकच होता आणि त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. गाडीत अन्य कोणीही प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली.
या घटनेनंतर प्रश्न उपस्थित होत आहे की, अशा विजेच्या पोलच्या उंचीचे कोणते मापदंड असतात का? तसेच, शहरात अवजड वाहने शिरल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असून याबाबत वीज मंडळ कोणतीही दखल घेत आहे की नाही.