पार्से येथील नंदू पार्सेकर या बेरोजगार युवकाला प्रभुदेसाई फाउंडेशन कडून आर्थिक मदत

पार्से येथील नंदू पार्सेकर या बेरोजगार युवकाला प्रभुदेसाई फाउंडेशन कडून आर्थिक मदत….
मोरजी :- पार्से येथील बेरोजगार युवक नंदू पार्सेकर याला पार्से येथील प्रभुदेसाई फाउंडेशन तर्फे घर दुरुस्ती साठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले.
प्रभुदेसाई फाउंडेशन चे विश्वस्त देवेंद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते ही आर्थिक मदत नुकतीच श्री पार्सेकर यांना प्रदान करण्यात आली.यावेळी त्यांच्या सोबत मिगेल फर्नांडिस,राजन कांबळी अन्य नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री देवेंद्र प्रभुदेसाई म्हणाले, नंदू पार्सेकर सारखे युवक आज नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना कुणाचा आधार नाही आर्थिक परिस्थिती मुळे ते आपले राहते झोपडी वजा घर दुरुस्त करू शकत नाहीत.सरकार मोठ मोठ्या घोषणा करते अंत्योदय तत्वावर चालत असल्याचा प्रचार करते मात्र नंदू सारख्या गरजूंना कोणत्याच प्रकारची मदत मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.अशा वेळी प्रभुदेसाई फाउंडेशन त्यांना अल्पशी आर्थिक मदत देऊ केली आहे. समाजातील अन्य दात्यांनीही त्यांना मदत करावी असेही ते म्हणाले.
यावेळी प्रभुदेसाई फाउंडेशन चे विश्वस्त देवेंद्र प्रभुदेसाई यांनी आपल्याला घर दुरुस्ती साठी आर्थिक मदत केल्याबद्दल श्री नंदू पार्सेकर यांनी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केले.